National Kho Kho Championship 2024 : राष्ट्रीय खोखो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर 

National Kho Kho Championship 2024 : सांगलीचा अक्षय मासाळ आणि धाराशीवची संपदा मोरे करणार महाराष्ट्राच्या संघांचं नेतृत्व

282
National Kho Kho Championship 2024 : राष्ट्रीय खोखो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर 
National Kho Kho Championship 2024 : राष्ट्रीय खोखो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर 

ऋजुता लुकतुके

भारतीय खो खो फेडरेशनच्या वतीने नवी दिल्लीत २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे (Maharashtra Kho-Kho Association) सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा (Adv. Govind Sharma) यांनी महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारांची घोषणा केली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना व कर्णधारांना फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव (Dr. Chandrajit Jadhav), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjivraje Naik Nimbalkar), कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  (National Kho Kho Championship 2024)

(हेही वाचा- IPL 2024 RR vs LSG : संजू सॅमसनच्या कप्तानी खेळीमुळे राजस्थानचा लखनौवर विजय)

या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे १९ मार्चपासून सुरु असलेले के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर रविवारी संपलं असून आता संघ नवी दिल्लीला स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. समारोपावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवतचे अध्यक्ष श्री विजयकुमार कत्रुवार, सचिव श्री बालकिशन भाऊ चांडक प्राचार्य डॉ. बी. एस. मुंडे, प्रा.डॉ.पवन पाटील, प्रवीण बागल, शिरीन गोडबोले, प्रा.संतोष सावंत, रणजीत जाधव, राम चौखट, विकास सूर्यवंशी, कृष्णा शिंदे, पंकज पवार, खेळाडू व मानवत चे सर्व खेळाडू आदी उपस्थित होते. या शिबिरात खेळाडूंनी कसून सराव केला असून ते अजिंक्यपद खेचून आणतील अशी अपेक्षा सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.  (National Kho Kho Championship 2024)

महाराष्ट्राचे अंतिम संघ खालील प्रमाणे जाहीर केले आहेत.  

पुरुष गट : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे),अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ (कर्णधार), सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), वेदांत देसाई (मुंबई), प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी) व्यवस्थापक :अनिल नलवाडे (परभणी) (National Kho Kho Championship 2024)

Untitled design 1

(हेही वाचा- IPL 2024 : आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत होणार?)

महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर,स्नेहल जाधव,कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे) गौरी शिंदे, संपदा मोरे(कर्णधार), ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली) मिताली बारसकर (मुं. उपनगर). प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी). (National Kho Kho Championship 2024)

Untitled design 1 1

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.