ऋजुता लुकतुके
प्रत्येक षटकात विजयाचं पारडं दुसऱीकडे झुकणं, ऐन भरात आलेली खेळी एका खराब फटक्यावर संपुष्टात येणं ही सगळी इंडियन प्रिमिअर लीग आणि एकूणच टी-२० क्रिकेटची वैशिष्ट्य आहेत. आणि तो पुरेपूर अनुभव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या चाहत्यांनी घरच्या चिन्नास्वामी मैदानावर घेतला. पण, अखेर बंगळुरू संघाने पंजाब किंग्जवर (PBKS) ४ गडी राखून मातही केली. त्यामुळे चाहते समाधानाने घरी परतले. (IPL 2024, RCB vs PBKS)
(हेही वाचा- IPL 2024 Players List : २०२४ च्या हंगामात आयपीएलमध्ये कुठला संघ आहे कागदावर बलवान? )
असं काय झालं या सामन्यात? बाराव्या षटकापर्यंत त्यांनी पंजाब किंग्जला ४ बाद ९७ धावांपर्यंत रोखलं होतं. त्यामुळे पंजाबची धावसंख्या दीडशेच्या आसपास राहील असं वाटत होतं. पण, तोच सॅम कुरन (२३), जितेश शर्मा (२७) आणि शशांक सिंगने नाबाद २१ धावा करत पंजाबला १७७ धावांचा टप्पा गाठून दिला. सलामीला शिखऱ धवनने ४५ धावांची चांगली पायाभरणी त्यांना करून दिली होती. (IPL 2024, RCB vs PBKS)
याला उत्तर देताना बंगळुरूचे फाफ डु प्लेसिस (३), कॅमेरुन ग्रीन (३) आणि ग्लेन मॅक्सवेल (१) हे तगडे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे बंगळुरूची वाटही अडचणीची झाली होती. पण, विराट कोहली (Virat Kohli) एक विराट खेळी खेळून बंगळुरूसाठी किल्ला लढवत होता. त्याने ४९ चेंडूंत ७७ धावा करत बंगळुरूच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. पण, इतक्यात एक बेसावध फटका खेळून तो हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या पाठोपाठ भरवशाचा अनुज रावतही ११ धावा करून बाद झाल्यामुळे सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक बंगळुरूला षटकामागे जवळ जवळ १३ धावा करण्याची गरज निर्माण झाली. आणि काही क्षण चिन्नास्वामी वरील ४०,००० प्रेक्षक अगदी चिडिचूप झाले होते. पण, संघातील सगळ्यात अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात आलेला महिपाल लोमरोव यांनी डोकं शांत ठेवून फटकेबाजी केली आणि बंगळुरूला विजय मिळवून दिला. (IPL 2024, RCB vs PBKS)
(हेही वाचा- Shivsena UBT-NCP (SP) ची पहिली यादी ‘सामना’तून प्रसिद्ध होणार?)
Virat Kohli turned up in yet another run-chase with his class 👏👏
He receives the Player of the Match award for his blazing knock 🏆
Scorecard ▶️ https://t.co/cmauIj3e0o#TATAIPL | #RCBvPBKS | @imVkohli pic.twitter.com/wQn28ikLyG
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2024
दिनेश कार्तिकने मोक्याच्या वेळी संघाला साथ दिली ती १० चेंडूंत २८ धावा करत. यात त्याचे ३ चौकार आणि २ षटकार होते. आणि लोमरोवला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आणायचा धोकाही यशस्वी ठरला. त्याने ८ चेंडूंत १७ धावा केल्या. संघाची अवस्था ६ बाद १३३ असताना दोघांची जोडी जमली. आणि संघाला आणखी ४४ धावांची गरज असली तरी हातात फक्त २१ चेंडू होते. पण, दिनेशने डोकं शांत ठेवून लोमरोवलाही मार्गदर्शन केलं. आणि शेवटच्या दोन षटकांत दोघांनी सामना खेचून आणला. (IPL 2024, RCB vs PBKS)
(हेही वाचा- Namaz : सोलापुरात मुसलमान विद्यार्थ्यांनी सरकारी महाविद्यालयातील वर्गातच नमाज पठण केले; तणाव वाढला)
बंगळुरूच्या विजयाचा पाया रचणारा विराट कोहली सामनावीर ठरला. तर स्पर्धेत सर्वाधिक धावा नावावर असलेल्या खेळाडूला मिळणारी ऑरेंज कॅपही आता विराटकडे आहे. बंगळुरू आणि पंजाब संघांचे दोन सामन्यांतून आता प्रत्येकी २ गुण झाले आहेत. (IPL 2024, RCB vs PBKS)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community