- सुजित महामुलकर
भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ (Secular) हा शब्द १९७६ मध्ये समाविष्ट करण्यात आला. या शब्दावर विश्व हिंदू परिषदेने तीव्र आक्षेप नोंदवला असून विहीपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी हा ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द घटनेतून काढून टाकावा अशी जोरदार मागणी केली आहे. (Secular)
(हेही वाचा- Larry Page : Google Guys म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन उद्योजक लॅरी पेज)
आंबेडकरांनी वगळले; इंदिरांनी समाविष्ट केले
देश स्वतंत्र झाल्यानंतर नोव्हेंबेर १९४८ मध्ये संविधान (Constitution) सभेत घटनेच्या प्रारूपावर आणि प्रस्तावनेवर चर्चा सुरू असताना प्रा. के. टी. शाह (Prof. K. T. Shah) यांनी घटनेच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाचा समावेश करावा अशी मागणी केली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सखोल अभ्यास करून ‘धर्मनिरपेक्ष’ (Secular) हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट केला नाही आणि तीन दशकानंतर १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात ४२ वी घटनादुरुस्ती करत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द संविधानात समाविष्ट केला. (Secular)
(हेही वाचा- Sangli Drugs : सांगलीत १५० कोटी रुपयांचे एमडी-ड्रग्ज जप्त; मुंबई पोलिसांचा कवठेमहांकाळ येथे छापा)
धर्मनिरपेक्षता युरोपिय संकल्पना
‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना विहीपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी आपली बाजू मांडताना कोणत्याही राजकीय पक्षाच्यावतीने बोलत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी कोणत्याही राजकीय पक्षाकरिता बोलत नाही. कारण मी कोणत्याही दलाचा माणूस नाही. धर्मनिरपेक्ष जेव्हा हा शब्द मूळ संविधानात होता का? नव्हता ना.. म्हणून अनेक लोकांची मागणी आहे, धर्मनिरपेक्षता वगैरे ही संकल्पना युरोपिय आहे, जो भारताचा स्वभावच नाही, तिथे याची आवश्यकताच नाही आणि तशी परिस्थितीही नाही. जो रोगच नाही त्यासाठीचे औषध घेऊन नवीन रोग होण्याची शक्यता आहे. सगळी औषधं ही पोटेंट असतात, त्या पोटेन्सीचा उपयोग नवीन रोग निर्माण करण्याकरता होईल आणि म्हणून संविधानकर्त्यांनी ज्या शब्दाचा विचार केला नव्हता, तो नंतर केला गेलेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अनेकांचे मत आहे की तो पुन्हा काढला गेला पाहिजे आणि सेक्युलर वगैरे या विषयाची भारतात आवश्यकता नाही,” असे परांडे यांनी ठामपणे सांगितले. (Secular)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community