दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) आणि विद्यमान खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचे पुत्र अभिनव डेलकर (Abhinav Delkar) यांची उबाठा गटाकडून (UBT) दादरा नगर हवेलीच्या (Dadra and Nagar Haveli) राज्य प्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
(हेही वाचा – ST Buses : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा एसटी महामंडळाला फटका; प्रवाशांची गैरसोय)
कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) या उबाठा गटाच्या विद्यनमान खासदार आहेत. असे असतांना भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या राज्य प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदी आता अभिनव डेलकर (Abhinav Delkar) यांच्याऐवजी श्वेतल भट यांची प्रभारी राज्यप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कलाबेन डेलकर यांचे मताधिक्य
कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा कार्यक्रमही न करता भाजपाने थेट यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी दादरा-नगर हवेलीचे तत्कालीन खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट येथील ‘सी ग्रीन साऊथ’ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी मोहन डेलकर यांनी गुजराती भाषेत एक चिठ्ठीही लिहून ठेवल्याचे सांगितले गेले. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत कलाबेन यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर महेश गावित यांना 66 हजार 157 मते मिळाली होती. (Shiv Sena UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community