- ऋजुता लुकतुके
हीरोची नवीन एक्सएफ ३आर (Hero XF3R) ही बाईक आता भारतात लाँचसाठी तयार झाली आहे. कंपनीची ही महत्त्वाकांक्षी बाईक आहे. तिची तयारी २०१६ पासून सुरू झाली होती. आणि कंपनीने तिचं उत्पादनही सुरू केलं होतं. आता २०२२ मध्ये पहिल्यांदा लोकांसमोर आल्यावर ही बाईक बाजारपेठेत घुसण्यासाठी तयार झाली आहे. (Hero XF3R)
(हेही वाचा- CM Pinarayi Vijayan : ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा)
दैनंदिन गरजांसाठी योग्य आणि तरीही डिझाईनने थोडी मॉडर्न अशी ही बाईक आहे. त्यामुळे फक्त तरुणच नाहीत तर मघ्यमवयीन लोकांनाही ती आवडू शकेल. हीरोची ही कन्सेप्ट बाईक आहे. एखादी दुचाकी किंवा कार बनवणारी कंपनी नवीन मॉडेल किंवा नवीन तंत्रज्जान बाजारात आणते, तेव्हा त्या फिचर्सनी युक्त असलेली दुचाकी किंवा कारला कन्सेप्ट कार किंवा दुचाकी म्हटलं जातं. (Hero XF3R)
हीरोची एक्सएफ ३ आर (Hero XF3R) ही बाईक डिझाईनच्या बाबतीत कन्सेप्ट बाईक आहे. डिझाईन अगदी मॉडर्न. पण, कामगिरी वास्तववादी आणि सर्व वयोगटातील लोकांना पसंत पडेल अशी. नुकतंच गाडीच्या मॉडेलचं पेटंटही कंपनीने उतरलं आहे. म्हणजेच ही बाईक आता लाँचसाठी तयार आहे. (Hero XF3R)
Naked Street Bike Hero XF3R To Hit Production; India Launch Soon https://t.co/0dNiYHEsQ5 via @DriveSpark #AutoNews pic.twitter.com/4j7jSJqbmX
— Kennedy Paul (@KennedyPaul79) January 28, 2017
गाडीला आधुनिक पद्धतीने डिजिटल क्लस्टर देण्यात आलं आहे. वेग, इंधन, प्रवासाचा पल्ला या गोष्टी या क्लस्टरवर दिसू शकतील. बाईकची सीट ही चालक आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशाची सोय बघणारी आहे. बाईकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसवलेली आहे. चालकाच्या सुरक्षेसाठी गाडी घसरणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. (Hero XF3R)
(हेही वाचा- Mahindra XUV300 2024 : महिंद्रा एक्सयुव्ही गाडीचं उत्पादन सुरू, काही दिवसांत होणार लाँच )
ही बाईक स्ट्रीटफायटर श्रेणीतील आहे. पण, त्यामानाने एक्सएफ ३ (Hero XF3R) आरची किंमत वाजवी आहे. म्हणजे भारतात ही बाईक १,६०,००० रुपयांपासून सुरू होईल. सुविधा आणि तंत्रज्जान यांचा मिलाफ या बाईकमध्ये पहायला मिळतो. (Hero XF3R)