खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणी निकाल येण्याआधीच अमरावतीसाठी भाजपाचा प्लॅन B तयार आहे. अमरावतीसाठी भाजपाकडून नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. नवनीत राणा यांचा बनावट जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी निकाल लागल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणांना दिलासा मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. (Navneet Rana)
(हेही वाचा – Arunachal Pradesh : ‘अरुणालच प्रदेश आमचाच’; चीनचा पुन्हा एकदा ‘हस्यास्पद’ दावा)
जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता :
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा जात प्रमाणपत्रावर १ एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. एक एप्रिलला निकाल लागल्यानंतर २ एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर ४ एप्रिलला नवनीत राणा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार अशीही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – ‘Secular’ शब्द घटनेतून काढून टाकावा: VHP ची मागणी)
नवनीत राणा पुन्हा युवा स्वाभिमान पार्टी कडूनच निवडणूक लढवणार :
अमरावती (Navneet Rana) लोकसभेची जागा घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या पुन्हा युवा स्वाभिमान पार्टी कडूनच २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. काही दिवसांपासून नवनीत राणा ह्या भाजपामध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण अमरावतीची जागा ही घटक पक्ष असलेल्या राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात आली आहे. (Navneet Rana)
(हेही वाचा – CM Pinarayi Vijayan : ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा)
नवनीत राणाऐवजी ‘या’ उमेदवारांच्या नावाचा विचार सुरु :
जर निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात लागला तर भाजपाचा प्लान बी तयार असून अमरावती प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहे. तसेच दिगवंत रा.सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी आयएएस अधिकाऱ्याचे नावही विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. (Navneet Rana)
(हेही वाचा – Arvind Kejriwal : केजरीवाल यांचे पैशाच्या बदल्यात दहशतवाद्याला सोडण्याचे आश्वासन; गुरपतवंत सिंग पन्नूचा दावा)
नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?
नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community