जून ते सप्टेंबर २०२३ दरम्यान झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गत वर्षीपेक्षा तुलनेने कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. राज्य शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. सद्यस्थितीत मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. येत्या पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केलेले आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे. (Water Cut)
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी २६ मार्च २०२४ रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राज्य शासनानेही निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. सद्यस्थितीत पाणीकपात करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा कोणताही प्रस्ताव नाही. (Water Cut)
मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे. (Water Cut)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=cRBfHypwgf4
Join Our WhatsApp Community