Lok Sabha Elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार शस्त्रे पोलिसांकडून ताब्यात 

173
Lok Sabha Elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार शस्त्रे पोलिसाकडून ताब्यात 
Lok Sabha Elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार शस्त्रे पोलिसाकडून ताब्यात 
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यातील (Line Police Station) गोळीबार आणि बोरिवली येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यभरातील शस्त्र परवानाधारकाचे परवाने तपासणी सुरू करण्यात आली आहे,  दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर परवाना असलेले शस्त्र पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. लोकसभा  निवडणुकांची (Lok Sabha Elections) तारीख जाहीर झाल्यापासून राज्यातील पोलिसांनी राज्यभरातून परवाना असलेले ४५ हजार शस्त्रे (रिव्हॉल्व्हर, पिस्तुल) ताब्यात घेतले असून  ३०८ बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. (Lok Sabha Elections)
स्वतःच्या आत्मसरंक्षणासाठी राज्यात ७७ हजार १४८ शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. राजकीय नेते, व्यावसायिक, उद्योगपतीसह खाजगी कंपन्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे  दुसऱ्या राज्यातील व्यावसायिक, उद्योगपती, सुरक्षा रक्षक आणि काही राजकीय नेत्याकडे महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यातील शस्त्र परवाने आहेत, त्यापैकी अनेकांचे परवान्याचे नूतनीकरण झालेले नसून अनेकांनी महाराष्ट्र पोलीसाकडे या परवान्याची नोंद केलेली नाही. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून केलेला अंदाधुंद गोळीबार, तसेच बोरिवली येथे शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक यांच्यावर सुरक्षा रक्षक यांच्या परवाना असलेल्या पिस्तुलमधून झालेला गोळीबाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने या दोन्ही घटना गंभीरतेने घेऊन राज्यातील शस्त्र परवाने तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. मुंबईसह राज्यभरात पोलिसांकडून शस्त्र परवाने तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Lok Sabha Elections)
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर होताच राज्यातील परवाना असलेले शस्त्र ताब्यात घेणे, बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्याचे काम राज्यभरात सुरू आहे.  निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून परवाना धारक यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेऊन निवडणुकीनंतर हे शस्त्र परवाना धारकांना परत केले जाते. मुंबईसह राज्यात ७७ हजार १४८ शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात आलेले असून त्यापैकी केवळ ४५ हजार ७५५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आलेली असून उर्वरित शस्त्रे ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीसांकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान ३०८ बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हे दाखल करून अनेकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Lok Sabha Elections)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.