पंजाबमध्ये केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात आम आदमी पक्षाच्या सरकारप्रती लोकांमध्ये तीव्र रोष दिसून आला आहे. स्थानिक जनता आता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. यामुळे भाजपाने पंजाबमधील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election)
भारतीय जनता पक्षाने पंजाबमधील ‘एकला चलो’ची मार्ग पकडला आहे. शिरोमणी अकाली दलासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने पंजाबमधील सर्व १३ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांनी मंगळवारी एक्सवर पोस्ट करून यास दुजोरा दिला आहे. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – K. Kavitha: के. कविता यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी)
मान सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष
पंजाबमध्ये शेवटच्या सातव्या टप्प्यात मतदान होणे आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपाने राज्यांत अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. यात मुख्यमंत्री भगवंतसिंग मान सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिवाय, स्थानिक जनता आता तिसरा पर्याय शोधत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही चांगला फीडबॅक मिळत आहे. (Lok Sabha Election)
यामुळे भाजपाने पंजाबमध्ये युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. जाखड यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, ‘पंजाबमधील जनता, पक्ष कार्यकर्ते, नेते आणि शेतकऱ्यांच्या मताच्या आधारे पक्षाने हा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील सर्व व्यापारी, मजूर आणि मागासवर्गीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – IPL 2024 Schedule : आयपीएलच्या २०२४ च्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक; सामने कुठे, कधी होणार?)
जनता आपच्या सरकारवर नाराज
जाखड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने केलेले काम कोणापासून लपलेले नाही. “गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांच्या पिकांची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी करण्यात आल्याचा दावाही भाजपा नेत्याने केला. २०१९ मध्ये पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ पैकी आठ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यानंतर एसएडी आणि भाजपाने युती करून निवडणूक लढवली आणि प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. (Lok Sabha Election)
आपने पंजाबमधील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागा जिंकून नेत्रदीपक यश मिळविले आहे आणि सरकार स्थापन केली होती. मात्र, आता स्थानिक जनता आम आदमी पक्षाच्या सरकारवर नाराज आहे. शिवाय, अहंकारापोटी आपने पंजाबमध्ये काँग्रेसला एकही जागा दिलेली नाही. (Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community