Mahayuti मध्ये येऊन महादेव जानकर फसले का?

महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता जास्त असून त्यांना भाजपाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. 

275
Mahayuti मध्ये येऊन महादेव जानकर फसले का?

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अखेर महायुतीला पाठिंबा देत एक जागा पदरात पाडून घेतली. असे असले तरी त्यांना ही निवडणूक सोपी जाणार का? असा प्रश्न केला जात आहे. (Mahayuti)

अजित पवार बारामतीवरील हक्क सोडणार का?

जानकर यांना बारामती किंवा त्यांची इच्छा असलेली परभणी, यापैकी एक जागा दिली जाईल अशी चर्चा आहे. बारामतीत आधीच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रमुख शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे नाव चर्चेत आहे. आता जानकर यांच्यासाठी अजित पवार बारामतीवरील हक्क सोडणार का? (Mahayuti)

बारामती म्हणजे शरद पवारांसाठी प्रतिष्ठा 

जानकर बारामतीतून लढणार नाहीत, अशी शक्यता आहे. याचे कारण म्हणजे अजित पवार ही जागा सोडण्यास तयार होणे कठीण आहे. तसेच या मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्यासमोर जानकर कितपत टिकतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनी सुप्रिया निवडून येतील याची व्यूहरचना आखली असल्याचे बोलले जात असून अजित पवार यांचे जवळचे कुटुंबियदेखील सुप्रिया यांच्या प्रचारासाठी मैदानार उतरले आहेत. शरद पवार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असून जानकर यांचा त्यापुढे कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. (Mahayuti)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४५ हजार शस्त्रे पोलिसांकडून ताब्यात)

जानकरांना परभणीत विरोध

दुसरी शक्यता जानकर यांना परभणी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र तिथेही भाजपाकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परभणी या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ असून त्यात ४ परभणी जिल्ह्यातील आहेत तर २ जालनामध्ये मोडतात. जालना जिल्ह्यातील बबनराव लोणीकर यांनी जानकर यांची उमेदवारी घोषित होण्याआधीच विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जानकर यांना भाजपाचे मतदार स्वीकारणार आणि मतदान करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने देऊन बाहेरचा उमेदवार देऊ नये तसेच या मतदार संघात भाजपाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली आहे. (Mahayuti)

जानकर कमळावर लढणार का?

महादेव जानकर हे भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढले तर परभणीत त्यांना असलेला विरोध कमी होऊ शकतो मात्र जानकर यांनी रासपतर्फे आणि आपल्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्यावर ठाम असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे जानकर यांना ही निवडणूक सोपी नाही, हे निश्चित. (Mahayuti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.