Nashik Water Supply: नाशिकमध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागात ? जाणून घ्या …

सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार असून गुरुवारी, (२८ मार्च) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

259
Water Supply : पाणी समस्या तरीही महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडण्यांची खैरात
Water Supply : पाणी समस्या तरीही महापालिकेच्यावतीने नवीन जलजोडण्यांची खैरात

नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुरुस्तीविषयक कामांमुळे बुधवारी, (२७ मार्च) निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा (Nashik Water Supply) बुधवारी बंद राहणार असून गुरुवारी, (२८ मार्च) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे तसेच स्मार्ट सिटीमार्फत शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र फिल्टर बेडचे वॉल बदलण्याचे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकीकरण तसेच इतर महत्त्वाची कामे करणे, अमृतवाणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची गळती बंद करणे, शिवाजीनगर मेघा इंडस्ट्रिज आणि संदीप प्लास्टिकच्या कंपाउंडलगतची ५०० मिलीमीटर व्यासाची पीएससी लाइनची गळती बंद करणे इत्यादी दुरुस्तीची यादरम्यान केली जाणार आहेत. (Nashik Water Supply)

(हेही वाचा –Mahakali Mantra : महाकाली मंत्राचा जप करा आणि अद्भुत चमत्कारिक परिणाम मिळवा!  )

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारी ठिकाणे –

– सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ ते अकरा, २६ व प्रभाग क्रमांक २७ भागश: चुंचाळे, दत्तनगर, माऊली चौक.
– पश्चिम विभागातील प्रभाग सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाउस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांतिनिकेतन आदी. प्रभाग क्रमांक १२ मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पीटीसी संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तूपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्रीनगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक व गायकवाडनगर परिसर इत्यादी.
– सिडकोतील प्रभाग २५ (भागश: परिसर), इंद्रनगरी परिसर, कामटवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर. प्रभाग २६ (भागश: परिसर) शिवशक्तीनगर, आयटीआय पुलाजवळी परिसर, बॉम्बे टेलर परिसर
– प्रभाग २७ (भागश: परिसर) चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर, प्रभाग २८ (भागश: परिसर) खुटवडनगर, माऊली लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मीनगर

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.