Human Trafficking Racket : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट उध्वस्त; दोन जणांना अटक, चार भारतीयांची थायलंडमधून सुटका

ठाण्यात राहणारा सिद्धार्थ यादव या तरुणाला जेरी आणि गॉडफ्री आणि रोहित नावाच्या व्यक्तीने डिसेंबर २०२२ कॉल सेंटरमध्ये गलेलठ्ठ पगाराचे अमिष दाखवून बँकॉक थायलंड मार्गे लाओस या देशात पाठवण्यात आले होते. लाओसमध्ये फसवणूक करून आणलेले जवळपास २५ भारतीय एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होते.

195
Human Trafficking Racket : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट उध्वस्त; दोन जणांना अटक, चार भारतीयांची थायलंडमधून सुटका

थायलंडपासून जवळ असणाऱ्या ‘लाओस’ या देशात भारतीय तरुणांची तस्करी करून त्यांच्याकडून बेकायदेशीर कृत्य करून घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला उध्वस्त करण्यात आले आहे. या टोळीतील २ जणांना मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. या टोळीने भारतातुन जवळपास २५ तरुणांना नोकरीच्या बहाण्याने थायलंड येथे छळछावणीत पाठवले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या छळछावणीतुन चार तरुणांची भारतीय दूतावासाने सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवल्यानंतर या टोळीचे काळेकृत्य समोर आले आहे. (International Human Trafficking Racket Busted)

जेरी फिलीप्स जेकब (४६) आणि गॉडफ्री थॉमस अल्वारेस (३९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचा थायलंडस्थित आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्ये सहभाग होता. या रॅकेटच्या तावडीतून नुकतीच सुटका होऊन भारतात परतलेल्या सिद्धार्थ यादवने नुकतीच विलेपार्ले पोलीस ठाण्यात या टोळीच्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. ठाण्यात राहणारा सिद्धार्थ यादव या तरुणाला जेरी आणि गॉडफ्री आणि रोहित नावाच्या व्यक्तीने डिसेंबर २०२२ कॉल सेंटरमध्ये गलेलठ्ठ पगाराचे अमिष दाखवून बँकॉक थायलंड मार्गे लाओस या देशात पाठवण्यात आले होते. लाओसमध्ये फसवणूक करून आणलेले जवळपास २५ भारतीय एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होते. (Human Trafficking Racket)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीवरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाद)

चिन्यांचा तक्रार मागे घेण्यास भारतीय तरुणांवर दबाव 

हे कॉल सेंटर एक प्रकारची भारतीय तरुणांसाठी छळछावणी आहे, या कॉल सेंटरमधून अमेरिका, कॅनडा व इतर देशात राहणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यात येत होती. या फसवणुकीच्या कामात भारतीय तरुणांना बळजबरीने लोटले जात होते, ज्या भारतीय तरुणाने हे काम करण्यास नकार दिल्यावर त्याचा छळ केला जात होता व त्याला मारहाण केली जात होती. क्षुल्लक चुका आणि कारणांमुळे मोठा दंड ठोठावुन त्यांच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करून तुटपुंजा पगार दिला जात होता असे यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. पासपोर्ट जमा केल्यामुळे येथून बाहेर पडणे भारतीयांना कठीण होऊन बसले होते, अखेर या छळाला कंटाळून काही भारतीयांनी लाओसमधील भारतीय दूतावासाला मेल करून तक्रार दाखल केली. तक्रार केली म्हणून या तिघांना तेथील चिन्यांनी मारहाण देखील केली व तक्रार मागे घेण्यास दबाव टाकत होते. (Mumbai Crime Branch)

अखेर भारतीय दूतावासाने येथून चार जणांची कशीबशी सुटका करून त्यांना भारतात पाठवले सिद्धार्थने भारतात आल्यानंतर प्रथम विलेपार्ले पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मुंबई गुन्हे शाखा कक्षा ८ चे प्रपोनि. लक्ष्मीकांत साळुंखे यांनी आपल्या पथकासह जेरी जेकब, गॉडफ्री थॉमस अल्वारेस यांचा शोध घेऊन त्यांना भारतातून परदेशात पळून जात असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. या टोळीवर विलेपार्ले पोलीस ठाणे येथे कलम ४२०, ३७०, ३२३, ३४२, ३४६, ३४७, ३८६, ५०४, ५०६, ३४, १२० (ब) भा.द.वि. सं सह कलम १०, २४ इमीग्रेशन अॅक्ट १९८३ हा गुन्हा गु.अ.वि., गु.प्र.शा. गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष८ करीत आहे. (Human Trafficking Racket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.