लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी वैशिष्ट्यपूर्ण क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातच सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. याचा फायदा घेत तेलंगणातील एका तरुणाने लग्नपत्रिकेतून केलेल्या निवडणुकीनिमित्त केलेल्या अनोख्या प्रचाराची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. (Lok Sabha Election Campaign)
लग्नपत्रिकेद्वारे मोदिंना मत द्या, असं आवाहन या तरुणाने केलं आहे. तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या नंदिकांती नरसिमलू यांच्या मुलाचं ४ एप्रिलला लग्न सोहळा साजरा होणार आहे. या लग्नाची सध्या लगबग सुरू आहे. त्यासाठी लग्नपत्रिका छापण्यात आल्या असून त्याचं वाटप सुरू केलं आहे. (Lok Sabha Election Campaign)
तेलंगणा मधून एक अनोखी लग्न पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये चक्क मोदींसाठी मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
.
.#telangana #weddingcard #socialmedia #vote #modi #viral #trending #loksabhaelection #election2024 pic.twitter.com/D6MsS2O9DZ— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 26, 2024
आपल्याकडे लग्नपत्रिकांमध्ये ‘आहेर स्वीकारला जाणार नाही, अशी सूचना आपण अनेकदा वाचली असेल’, पण ‘लग्नाला आहेर आणण्याऐवजी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मत द्या’, असं आवाहन (Prime Minister Narendra Modi) पहिल्यांदाच कोणीतरी केलं असेल. सोशल मिडियावर ही लग्नपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याची चर्चाही सुरू आहे.
हेही पहा –
.
Join Our WhatsApp Community