लीला दुबे (Leela Dubey) यांचा जन्म २७ मार्च १९२३ साली झाला. त्या एक मानववंश शास्त्रज्ञ आणि फेमिनिस्ट स्कॉलर होत्या. लोक त्यांना प्रेमाने लीलादी अशी हाक मारायचे. लीला दुबे या दिवंगत प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सुमाती मुटाटकर यांची लहान बहीण होय! त्यांचं लग्न स्व. श्यामा चरण दुबे यांच्याशी झालं होतं. या दाम्पत्याला दोन मुलं झाली. स्व. मुकुल दुबे आणि सौरभ दुबे अशी त्यांची नावं आहेत.
स्त्री या विषयावर अभ्यास आणि रिलेशनशीप्स या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. लीला दुबे (Leela Dubey) या शिक्षिकाही होत्या. १९६० साली मध्य प्रदेश इथल्या सागर विद्यापीठात त्यांनी पहिल्यांदा शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर १९७५ साली त्यांनी दिल्ली येथे स्थलांतर केलं. १९७४ साली स्त्रियांच्या परिस्थितीवरच्या समितीच्या वतीने अहवाल तयार करण्यासाठी लीला दुबे यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. या अहवालाची चर्चा भारताच्या संसदभवनात स्त्रियांविषयीच्या अभ्यासासाठी झाली.
१९७० च्या दशकामध्ये लीला दुबे (Leela Dubey) या समाजशास्त्र या विषयी असलेल्या संस्थेच्या मुख्य व्यक्ती होत्या. त्यावेळेस त्यांनी स्त्रियांच्या बाबतीतल्या समस्यांवर प्रकाश टाकला. १९८० मध्ये त्यांनी ग्रामीण पर्यावरण नावाचा एक कोर्स सुरू केला. हा कोर्स बिझनेस मॅनेजमेंट टेक्निक प्रोग्रामशी संबंधित होता. या कोर्समध्ये ग्रामीण भागातल्या समाजाच्या समस्येशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला गेला होता. लीला दुबे यांचे आतापर्यंत अनेक लेख आणि पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक कामांसाठी लाईफटाईम अर्चिव्हमेंट अवार्ड आणि स्वामी प्रणवानंद हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community