लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराला जोर आला आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी २६ मार्चच्या रात्री आंतरवाली सराटी येथे जाऊन (Antarwali Sarathi) मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशात प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतल्यामुळे वातावरण तापले आहे. (Prakash Ambedkar)
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील गडकरी आणि फडणवीसांवर मोठी जबाबदारी)
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरापर्यंत बैठक घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर थेट आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. या वेळी त्यांनी तासभर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या भेटीविषयी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नेमकी काय चर्चा झाली, याबाबत वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका २७ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत.
मला हलक्यात घेऊ नका – मनोज जरांगे
‘माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही, म्हटले तर नाही. पण समाज हो म्हटला,तर इतक्या ताकदीने उतरणार की, त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते, तसे राजकारणात घेऊ नयेत असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. वंचितकडून प्रस्ताव आला असला, तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. त्यामुळे समाजाच्या म्हणण्यानुसार 30 तारखेला चित्रच स्पष्ट करू. गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेऊ, माझा जनचळवळीवर विश्वास आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीविषयी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Prakash Ambedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community