Border-Gavaskar Trophy 2024 : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थ कसोटीने 

Border-Gavaskar Trophy 2024 : तब्बल ३२ वर्षांनंतर दोन्ही देशांत ५ कसोटींची मालिका होत आहे 

168
Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती
Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा (Australia tours) कार्यक्रम जाहीर केला आहे. नोव्हेंबर महिन्यात भारताचा हा दौरा सुरू होणार आहे. यात पहिली कसोटी पर्थ इथं खेळवली जाणार आहे. तर तिथल्या परंपरेनुसार नवीन वर्षातील शेवटची कसोटी ही सिडनीत होणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Prakash Ambedkar : वंचितची पहिली उमेदवार यादी; मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी?)

तब्बल ३२ वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (India VS Australia) संघ ५ कसोटींची मालिका खेळणार आहेत. यापूर्वी १९९१-९२ च्या दौऱ्यात पाच कसोटी झाल्या होत्या. आणि ती मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली होती. यंदाच्या मालिकेतील दुसरी कसोटी ॲडलेडला रात्र-दिवस खेळवली जाणार आहे. ॲडलेड हे दिवस-रात्र कसोटीसाठी ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय ठिकाण आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

त्यानंतर तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन इथं, तर चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना (Test match) मेलबर्नला आणि पाचवा आणि अंतिम नवीन वर्षाचा कसोटी सामना सिडनीला होणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Cash Seized : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्कॉर्पिओ गाडीत सापडली 50 लाखांची रोकड)

गेल्यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान चांगलं द्वंद्व पाहायला मिळालं. साखळी सामन्यात भारतीय संघ जिंकला असला तरी अंतिम फेरीत मात्र दोनदा भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने गदा पटकावली. तर अलीकडे नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारताचा ६ गडी राखून पराभव केला. (Border-Gavaskar Trophy 2024)

क्रमांक

कसोटी ठिकाण

तारीख

दिवस/रात्र – दिवस

पर्थ

२२ नोव्हेंबर २०२४

दिवस

ॲडलेड

६ डिसेंबर २०२४

दिवस-रात्र

ब्रिस्बेन

१४ डिसेंबर २०२४

दिवस

मेलबर्न

२६ डिसेंबर २०२४

दिवस

सिडनी

३ जानेवारी २०२५

दिवस

(हेही वाचा- IPL 2024 : बंगळुरू संघाच्या पहिल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये असा झाला जल्लोष )

१९९६-९७ च्या हंगामापासून बोर्डर – गावसकर करंडकाला सुरुवात झाली. पहिली मालिका भारतातच पार पडली होती.  ती भारताने १-० ने जिंकली होती. मालिकेत निर्विवाद यश मिळवणारा संघ बोर्डर – गावसकर करंडक आपल्याकडे ठेवतो. एखादी मालिका बरोबरीत सुटली तर ज्या संघाकडे चषक असेल तिथेच तो कायम राहतो. आतापर्यंत सोळावेळा दोन संघांदरम्यान मालिका पार पडल्या असून एकूण ११ वेळा भारताने हा चषक पटकावला आहे. २०१६ पासून तर चषक भारताकडेच आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.