Vanchit Bahujan Aghadi २०१९ चा कित्ता पुन्हा गिरवणार?

यावेळी Vanhit Bahujan aghadi काँग्रेसला मदत करणार, राष्ट्रवादी (शप), शिवसेना उबाठाला फटका बसण्याची शक्यता. 

161
Vanchit Bahujan Aghadi २०१९ चा कित्ता पुन्हा गिरवणार?
  • सुजित महामुलकर

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी २०१९ चा कित्ता पुन्हा गिरवणार असल्याचे संकेत आज बुधवारी २७ मार्चला दिले. वंचित आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडत केवळ काँग्रेसच्या ठराविक ६-७ जागांवरील उमेदवारांना लोकसभा निवडणूकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून ओबीसी आणि मराठा समाजाच्या मदतीने तिसरी आघाडी उघडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि वंचितच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी अशी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Vanchit Bahujan Aghadi)

काँग्रेसशी सूत जुळले, उबाठाशी फाटले

गेल्या दोन महिन्यापासून महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी यांची चर्चा सुरु आहे. वंचितची अगोदरच शिवसेना उबाठा गटाशी युती झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा (शप) विरोध असताना महाविकास आघाडीसोबत वंचितची चर्चेची दारे खुली झाली. मात्र, दरम्यानच्या या दोन महिन्यात वैर असलेल्या काँग्रेसशी वंचितचे सूत जुळले आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठाशी फाटले. (Vanchit Bahujan Aghadi)

आंबेडकर-गांधी मुंबईत भेट, चर्चा

प्रकाश आंबेडकर यांनी उबाठावर टीका करत खोटेपणाचा आरोप केला आणि उबाठाशी युती तुटल्याचे जाहीर केले. १७ मार्चला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. आंबेडकर यांनी या मुंबईतील सभेदरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि काँग्रेसशी संधान बांधले. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – Royal Enfield Classic 350 Bobber : रॉयल एनफिल्डची क्लासिक बॉबर भारतात जूनमध्ये येणार)

२०१९ चा कित्ता पुन्हा गिरवणार?

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यात ४० मतदार संघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तर चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर या मतदार संघांत लाखाच्या वर मते घेतली होती. माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे त्याचप्रमाणे गडचिरोलीचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी, हातकनंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव हा केवळ वंचितच्या मतांमुळे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. धाराशिवचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील, परभणीचे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, रायगडचे शिवसेना उमेदवार अनंत गीते या मतदार संघातही वंचितने चांगला प्रभाव पाडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (Vanchit Bahujan Aghadi)

भाजपाला फायदा

यावेळी वंचितने काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याने आता वंचित महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठाची मते खाण्याची शक्यता आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त करत वंचित आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे भाजपाला फायदा होईल, असे मत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीने आठ उमेदवारांची घोषणा केली असून स्वतः प्रकाश आंबेडकर अकोला मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.