उबाठा गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच मविआमध्ये धुसपूस सुरु झाली आहे. नाराजी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस बरीच नाराज झाली आहे. या परिस्थितीवर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. भाजपासोबतचा युती तोडणाराच आता ठाकरे गटाची मविआसोबत असणारी आघाडीही तोडेल, अशी टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून जाहीर करण्यात आली. त्यात अनिल देसाई यांचे नाव नव्हते. त्यानंतर ते ट्विटरवरून देण्यात आले. ही पराभवाची मानसिकता आहे, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने बुधवारी आपली 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांत एकच खळबळ माजली. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार व संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर आघाडीच्या धर्माला गालबोट लावल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे गटाची ज्या लेटर हेडवर ठाकरे गटाची यादी जाहीर झाली, त्यावर बाळासाहेबांचे नाव छोट्या अक्षरात आहे. त्यांनी बाळासाहेबांचे नाव स्वतःच्या नावातही लिहिले नाही. सभेत हिंदू बोलण्याऐवजी राष्ट्र म्हणाले. विशेषतः ही यादी ट्विटरवरून जाहीर करण्यात त्यात अनिल देसाई यांचे नाव नव्हते. हे नाव नंतर ट्विटरवर टाकण्यात आले. ही पराभवाची मानसिकता आहे, असे शेवाळे म्हणाले.
(हेही वाचा Prakash Ambedkar : वंचितची पहिली उमेदवार यादी; मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी?)
मविआत नाराजी नाट्य
राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी यावेळी महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचाही आरोप केला. महाविकास आघाडीतील घटकपक्ष सद्यस्थितीत नाराज आहेत. भाजपासोबतची युती तोडण्यास जी व्यक्ती कारणीभूत ठरली, तीच व्यक्ती आता महाविकास आघाडी तोडण्यास कारणीभूत ठरेल. महाविकास आघाडीत आता बिघाडी दिसून येईल, त्याचे कारण संजय राऊत ठरतील, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community