LIC ही देशातील भारत सरकारची सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी या कंपनीवर पूर्णपणे मालकी हक्क हा सरकारचा आहे. गेल्या अनेक काळापासून LIC हा भारतीय समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. दिवसेंदिवस LICचा व्यवसाय विस्तारत असल्याचं चित्र दिसत असल्याचं एका अहवालानुसार प्रसिद्ध झालं आहे. (LIC)
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICने मोठा विक्रम केला आहे. जगातील अनेक दिग्गज विमा कंपन्यांना मागे टाकलं आहे. एलआयसी हा जगातील सर्वात मजबूत विमा ब्रॅंड बनला आहे. (LIC)
(हेही वाचा – Rahul Shewale : युती तोडणाराच महाविकास आघाडी तोडणार; राहुल शेवाळेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल)
ब्रॅंड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार, एलआयसीला सर्वोच्च रेट देण्याची माहिती देण्यात आली आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीची विमा ब्रँड व्हॅल्यू ९.८ अब्ज डॉलर असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कॅथी लाइफ इन्शुरन्स या कंपनीला दुसरे स्थान मिळाले आहे, NRMA इन्शुरन्स कंपनीला तिसरे स्थान मिळाले आहे. त्यामुळे LICआता जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड ठरला असून त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढतच आहे. याचा फायदा विमा कंपन्यांना होत आहे. (LIC)
एलआयसीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची विश्वासार्हताही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोकं गुंतवणूक करत आहेत. २०२३ मध्ये एलआयसी विमा कंपनीला ३९,०९० कोटी रुपयांचा प्रिमीयम मिळाला होता, तर SBI लाईफ इन्शुरन्सला १५,१९७ कोटी रुपयांचा प्रिमीयम मिळाला होता. HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनीला १०,९७० कोटी रुपयांचा प्रिमीयम मिळाला होता. (LIC)
(हेही वाचा – Congress : सांगलीत उबाठा उमेदवार माघार घेणार की काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढणार? विश्वजित कदमांच्या दिल्लीवारीने चर्चेला उधाण)
कर्माचाऱ्यांच्या पगारात वाढ
एलआयसी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील सतर्क आहे. अलीकडेच सरकारने LICकर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्क्यांची वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ,कॅथी लाइफ इन्शुरन्स या दुसऱ्या स्थानावर असलेल्या कंपनीच्या ब्रँन्ड व्हॅल्यूमध्ये 9 टक्क्यांची वाढ झालीय. या कंपनीची ब्रँन्ड व्हॅल्यू 4.9 अब्ज डॉलर झालीय, तर तिसरे स्थान मिळवलेल्या NRMA इन्शुरन्स कंपनीच्या ब्रँन्ड व्हॅल्यूमध्ये 82 टक्क्यांची वाढ झालीय. या कंपनीचे ब्रँन्ड व्हॅल्यू 1.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. (LIC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community