UBT : …आता दै. ‘सामना’लाही विसरली उबाठा शिवसेना!

७ उमेदवारांची यादी जाहीर करताना या पक्षाने या पूर्वीच्या सर्व परंपरा मोडीत काढल्या आहेत.

272

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नाही. आधी बाळासाहेबांच्या नावा पुढील हिंदुहृदयसम्राट या नावाचा उल्लेख करायला उबाठा (UBT) शिवसेना विसरली…त्यानंतर जाहीर सभेत जमलेल्या उद्धव ठाकरे ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो,’ अशी साद घालायला विसरले…आणि आता तर चक्क’ सामना’लाच विसरले…शिवसेना पक्षाची कोणतीही घोषणा किंवा पदाधिकारी नियुक्ती तथा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा ही सामना या मुखपत्रातून केली जाते. ही प्रथा आहे, परंतु लोकसभा निवडणूक २०२४ मधील उबाठा गटाच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी सामनामधून किंवा शिवसेना उबाठा (UBT) या अधिकृत एक्स वरून जाहीर न करता संजय राऊत यांनी आपल्या स्वतःच्या X वरून जाहीर केली. त्यामुळे उबाठा शिवसेनेची ही अधिकृत यादी कशी, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. तसेच ही यादी सामनातून प्रसिद्ध न करता शिवसेना आता सामनालाही विसरली का असाही सवाल केला जात आहे.

उबाठा शिवसेना हिंदुत्व विसरली

लोकसभेच्या आगामी निवडणुकीकरिता उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळ असताना तसेच जागांच्या वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला नसतानाही उबाठा (UBT) शिवसेनेने १७ लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ही नावे जाहीर करतानाच मुंबईतील सहा जागांपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. १७ उमेदवारांची यादी जाहीर करताना या पक्षाने या पूर्वीच्या सर्व परंपरा मोडीत काढल्या आहेत. उबाठा (UBT) शिवसेना ही मागील काही वर्षापासून हिंदुत्व विसरत चालली आहे. हिंदूंना विसरले आहेत. हिंदुहृदसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांना विसरत चालले आहेत. आणि भाषणामध्ये त्या ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…’ अशी साद  घातली जायची, त्यालाही विसरले.  पण आता  ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे असे दैनिक म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’लाही आता ते विसरले आहेत. लोकसभेच्या १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करताना उबाठा शिवसेनेने ही यादी ”सामना’ मधून प्रसिद्ध न करता थेट पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या ‘X’ वरून प्रसिद्ध केली. त्यामुळे आजवरच्या प्रथा आणि परंपरेला छेद देण्यात आल्याने पक्षाने जाहीर केलेली यादी अधिकृत आहे का, असा प्रश्न आता शिवसैनिकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. दुसरीकडे X वर ही यादी प्रसिद्ध केल्यामुळे ही उबाठा शिवसेना आता या आपल्या मुखपत्रालाही विसरली असल्याच्या भावना शिवसैनिक आणि मराठी माणसांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.

(हेही वाचा Rahul Shewale : युती तोडणाराच महाविकास आघाडी तोडणार; राहुल शेवाळेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल )

जाहीर यादी अधिकृत कशी? 

ज्येष्ठ शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना उमेदवारांच्या नावाची घोषणा ही पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केली. परंतु शिवसैनिकांचा जोवर ही यादी सामना मुखपत्रातून प्रसिद्ध होत नाही तोवर विश्वास बसत नाही आणि  तेव्हाच ते उमेदवार अधिकृत मानले जातील. परंतु जर ही यादी अधिकृत असेल आणि ती सामना ऐवजी संजय राऊत यांनी जाहीर केली असेल तरी त्यावर विश्वास ठेवणे हे योग्य ठरत नाही, असे  शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेने X वर पोस्ट करत उबाठाला (UBT) आता बाळासाहेबांचे नाव घ्यायलाही लाज वाटते का? उबाठा गटाच्या लेटरहेडवरून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव गायब असे पोस्टर पोस्ट करून टीका केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.