केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदार संघाचे महायुती उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले.
नागपूर येथील संविधान चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
(हेही वाचा – Arvind Kejriwal: ईडीच्या कोठडीत केजरीवालांची तब्येत बिघडली, डॉक्टर म्हणाले…)
संविधान चौकातून मिरवणक निघाली असून आकाशवाणी चौकात नितीन गडकरी जनतेला संबोधित करणार आहेत. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष गट, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे हे उपस्थित होते. (Nitin Gadkari)
आकाशवाणी चौकात जनतेला संबोधित केल्यानंतर नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राजू पारसे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community#WATCH : नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्ती प्रदर्शन, विजयाच्या हॅटट्रिकचा केला निर्धार.
.
.
(Source : @NitinGadkari) #viral #virals #trending #trendingreels #Nagpur #NitinGadkari #ShaktiPradarshan #BJP #marathinews #breaking #trending #maharashtra pic.twitter.com/v9yNvb7DsG— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 27, 2024