Indian Cricketer: पॉली उम्रीगर कोण होता? वाचा सविस्तर …

त्याचे वडील कपड्यांची कंपनी चालवत होते. तो सोलापुरात लहानाचा मोठा झाला आणि तो शाळेत असताना त्याचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले.

176
Indian Cricketer: पॉली उम्रीगर कोण होता? वाचा सविस्तर ...
पहलान रतनजी “पॉली” उम्रीगर हा भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) होता. तो भारतीय क्रिकेट संघासाठी १९४८ ते  १९६२ दरम्यान खेळला तसेच मुंबई आणि गुजरातसाठी (Mumbai, Gujarat) प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. पॉली उम्रीगरचा जन्म मुंबईत झाला असला तरी बर्‍याचदा सोलापूर हे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते. त्याचे वडील कपड्यांची कंपनी चालवत होते. तो सोलापुरात लहानाचा मोठा झाला आणि तो शाळेत असताना त्याचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले.
तो जन्माने पारशी होता. त्याने विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात मुंबई क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. १९४४ मध्ये बॉम्बे पेंटाँग्युलरमध्ये वयाच्या १८व्या वर्षी पारसी लोकांसाठी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने मुंबई विद्यापीठ संघाचे नेतृत्व केले. तो हॉकी आणि फुटबॉलदेखील खेळला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावले
उम्रीगर मुख्यत: मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळला. पण अधूनमधून मध्यमगती आणि ऑफ स्पिन गोलंदाजीही करायचा. त्याने १९५५ ते १९५८ या कालावधीत आठ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्याने सर्वाधिक अशा ५९ कसोटी सामन्यांर आपला खेळ दाखवला आहे. तसेच त्याने ३,६३१ एवढ्या सर्वाधिक कसोटी धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने सर्वाधिक १२ कसोटी शतके स्वतःच्या नावावर नोंदवली आहेत. त्याने हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावले होते. १९६२ मध्ये तो निवृत्त झाला. त्याला १९९८ मध्ये सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे माजी खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.