Bmc mc Bhushan Gagarani : आयुक्त बदलले, पण अतिरिक्त आयुक्तांकडील खाते आणि विभागांची जबाबदारी ‘जैसे थे’च

अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांच्याकडे सध्या सामान्य प्रशासन विभाग,यांत्रिक व विद्युत विभाग, विधी,मलनि:सारण प्रचालनसह शहर विभागाची जबाबदारी असून शिंदे यांच्याकडे आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता आदींसह पश्चिम विभागाची जबाबदारी आहे. मात्र, अभिजित बांगर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्या जागी झाल्याने त्यांच्याकडील खात्यांचा भार बांगर सांभाळत आहे.

3026
Mumbai Digital Board : मुंबईत झळकणार ४०० डिजिटल जाहिरात फलक, महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला वाढणार अडीच कोटींचा महसूल
  • सचिन धानजी,मुंबई

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत काही मंत्री पदाची शपथ घेतात, परंतु खाते वाटप त्यानंतर काही दिवस लोटले तरी होत नाही, तशीच काहीशी स्थिती आता मुंबई महापालिकेत दिसून येत आहे. महापालिका आयुक्त म्हणून भुषण गगराणी यांनी मागील २० मार्च रोजी पदाचा भार स्वीकारला. त्यानंतर आठ दिवसांचा अवधी लोटत आला तरी चारही अतिरिक्त आयुक्तांकडे कोणत्या खात्याची तसेच विभागांची जबाबदारीच त्यांना अद्याप करता आलेले नाही. विभाग आणि खात्यांचे वाटप न झाल्याने सध्या तरी ज्यांच्या जागावर आपली नियुक्ती झाली आहे, त्याच पदांचा भार सांभाळण्याकडे अधिकाऱ्यांचा कल दिसून येत आहे.

आयुक्तांसमवेत दोन अतिरिक्त आयुक्त हे नवखे

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या जागी भुषण गगराणी यांची नियुक्ती करण्यत आली आणि त्यांच्यासोबतच अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्या जागी अभिजित बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या जागी अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महापालिकेत आयुक्तांसमवेत दोन अतिरिक्त आयुक्त हे नवखे असून अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी या महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ तसेच अनुभवी अधिकारी आहेत. तसेच त्यानंतर अनुभवी अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ सुधाकर शिंदे हे आहेत. (Bmc mc Bhushan Gagarani)

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी

अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांच्याकडे सध्या सामान्य प्रशासन विभाग,यांत्रिक व विद्युत विभाग, विधी,मलनि:सारण प्रचालनसह शहर विभागाची जबाबदारी असून शिंदे यांच्याकडे आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता आदींसह पश्चिम विभागाची जबाबदारी आहे. मात्र, अभिजित बांगर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्या जागी झाल्याने त्यांच्याकडील खात्यांचा भार बांगर सांभाळत आहे. बांगर हे इथे येण्यापूर्वी ठाणे महापालिकेचे आयुक्त राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. त्यामुळे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांमध्ये सर्वांत ज्येष्ठ अधिकारी म्हणून डॉ जोशी असल्या तरी प्रकल्प विभागाची जबाबदारी ही बांगर यांच्याकडेच ठेवली जाईल असे स्पष्ट संकेतच असल्याने त्यांच्याकडून खात्यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जोशी यांच्याकडून शहर विभागाचा भार काढून त्यांना दुसऱ्या क्रमांकाचा भार सोपवावा लागणार आहे. (Bmc mc Bhushan Gagarani)

(हेही वाचा – Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत)

सनदी अधिकारी म्हणून ज्येष्ठता विचारात घेता

यापूर्वी अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन या ज्येष्ठ असूनही प्रविण दराडे यांच्याकडे प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे कुंदन या प्रचंड नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी आपली बदली करून घेतली होती. त्यानंतर वेलारासू यांच्यापेक्षा आश्विनी भिडे या ज्येष्ठ असूनही पी वेलारासू यांच्याकडे प्रकल्पाची जबाबदारी ठेवून भिडे यांच्याकडे पूर्व उपनगराची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे सनदी अधिकारी म्हणून ज्येष्ठता विचारात घेता महापालिका आयुक्तांना डॉ अश्विनी जोशी यांच्याकडील शहर विभाग काढून पूर्व उपनगरे किंवा पश्चिम उपनगरे विभागाचा भाग सोपवावा लागणार आहे. विशेष म्हणजे आयुक्त रजेवर गेल्यास त्या कालावधीत या पदाची प्रभारी सुत्रे ही कायमच ज्येष्ठ अधिकारी यांच्यावर सोपवली जातात. त्यामुळे भविष्यात प्रभारी आयुक्त पदाचा भार डॉ. जोशी यांना स्वीकारावा लागणार आहे. (Bmc mc Bhushan Gagarani)

नवीन दोन अतिरिक्त आयुक्तांचाही तेवढाच होमवर्क

निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त झालेले भुषण गगराणी यांनी यापूर्वी महापालिकेत सहआयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त पद भुषवलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभार जाणून घेण्यात त्यांना बराच वेळ जाणार आहे. मुळात त्यांना जेव्हा कारभार समजेल तेव्हाच ते विभाग आणि खात्यांची जबादबारी ही प्रत्येक अतिरिक्त आयुक्तांवर सोपवतील. त्यामुळे आज जे अतिरिक्त आयुक्त ज्या अधिकाऱ्यांच्या रिक्तपदी नियुक्त झाले आहेत आणि त्यांच्याच खात्यांचा व विभागांची जबाबदारी पाहत आहेत, पण काही दिवसांनी पुन्हा खात्यांची व विभागांची जबाबदारी बदलली तर त्यांना नव्याने आढावा घेत कामकाज समजून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे ते प्रांरभीच बदलणे आवश्यक असते. परंतु आयुक्तांना जर कामकाज समजून घ्यावे लागत असेल तर तिथे आता नवीन दोन अतिरिक्त आयुक्तांचाही तेवढाच होमवर्क होईल,असे सेवा निवृत्त अधिकारी मिश्कीलपणे सांगतात. (Bmc mc Bhushan Gagarani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.