IND – PAK Cricket : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भरवायचीय भारत – पाक मालिका

याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मालिका भरवण्याचा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिला आहे

180
IND - PAK Cricket : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भरवायचीय भारत - पाक मालिका
IND - PAK Cricket : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भरवायचीय भारत - पाक मालिका
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत – पाकिस्तान क्रिकेट (IND – PAK Cricket) मालिका भरवण्यात आपल्याला अजूनही रस असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर नोव्हेंबर महिन्यात ही मालिका भरवण्याचा प्रस्ताव बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डासमोर ठेवल्याचीही बातमी समोर येतेय. संबंधित दोन्ही क्रिकेट मंडळांची परवानगी असेल तर भविष्यात कधीही ही मालिका भरवण्यासाठी आपण तयार आहोत, असंही त्यांचं म्हणणं आहे.

गंमत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेट मालिकांच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात असणार आहेत. भारतीय संघ २२ नोव्हेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचणार आहे. आणि या मालिकेपूर्वी पाक संघ ऑस्ट्रेलियात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. (IND – PAK Cricket)

त्यामुळे या दरम्यानच भारत – पाक कसोटी मालिकाही भरवण्याचा ऑस्ट्रेलियाचा विचार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ २०१२ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. आयसीसीच्या विश्वचषक, आशिया आणि चॅम्पियन्स करंडक या स्पर्धांमध्ये फक्त दोन देश समोरासमोर येतात. (IND – PAK Cricket)

(हेही वाचा – IPL 2024, MI vs SRH : मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैद्राबादच्या २७७ धावांच्या ओझ्याखाली मुंबई दबली)

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट व्यवस्थापक पीटर रोच यांनी हा कार्यक्रम जाहीर करताना भारत – पाक मालिकेची शक्यताही बोलून दाखवली आहे. ‘भारत – पाक मालिकेसाठी प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. आणि अशा मालिकेची संधी प्रेक्षकांना मिळावी, असं आम्हालाही वाटतं. या मालिकेसाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांशी बोलण्याचीही आमची तयारी आहे,’ असं रोच यांनी म्हटलं आहे. (IND – PAK Cricket)

भारत – पाक सामन्यासाठी मेलबर्नचं एमसीजी क्रिकेट ग्राऊंड पूर्वी पूर्ण भरलं होतं. या स्टेडिअमची क्षमता ८०,००० इतकी आहे. त्यामुळे जगाला अव्वल दर्जाची क्रिकेट स्पर्धा बघायला मिळावी, यासाठी ऑस्ट्रेलिया पुढाकार घेत असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे. (IND – PAK Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.