लेडी गागा हिचा जन्म २८ मार्च १९८६ साली युनायटेड स्टेट्समधील न्यूयॉर्क सिटी येथे झाला. लेडी गागा (Lady Gaga) ही एक व्यावसायिक गायिका, गीतकार आणि अभिनेत्री आहे. गागा हिने लहानपणापासूनच शाळेच्या नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. तसेच ती ओपन माईक नाईटमधेही गाणी गायची. संगीतात आपली कारकीर्द घडवण्याआधी तिने कोलॅब्रेटीव्ह आर्ट्स प्रोजेक्ट २१ या विषयाचा अभ्यास केला होता. (Lady Gaga)
जॅम रेकॉर्डिंग्जस कंपनीने गागासोबत केलेला करार रद्द केला. त्यानंतर गागा ही सोनी म्युझिक कंपनीसाठी गीतकार म्हणून काम करायला लागली. २००७ साली तिने इंटरस्कोप रेकॉर्ड्स कंपनी आणि कॉन लाईव्ह डिस्ट्रिब्युशन या कंपन्यांसोबत काम करण्यासाठी करार केला. त्यावेळी द फेम नावाचा तिचा (Lady Gaga) पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला. त्याप्रमाणेच जस्ट डान्स आणि पोकर फेस हे सोलो म्युझिक अल्बम प्रदर्शित झाले. २००९ साली द फेम मॉनस्टर नावाचा तिचा आणखी एक अल्बम आला. त्यामध्ये बॅड रोमँस, अल्जेड्रो आणि टेलिफोन ही तिची सोलो गाणी होती. (Lady Gaga)
(हेही वाचा – Novak Djokovic : नोवाक जोकोविचने गोरान इव्हानोसेविचबरोबरची भागिदारी का मोडली?)
‘हा’ अवॉर्ड मिळवणारी लेडी गागा पहिली महिला
२०११ साली प्रदर्शित झालेल्या लेडी गागा (Lady Gaga) हिच्या बोर्न धिस वे नावाच्या अल्बमच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या. या अल्बमचं शिर्षकगीत हे आयट्युन्स स्टोअरवरचं सर्वात जलदगतीने विकलं जाणारं गाणं ठरलं. हे गाणं एका आठवड्यापेक्षा कमी दिवसांत जवळपास दहा लाख लोकांनी डाउनलोड केलं. (Lady Gaga)
गाण्यासोबतच अभिनय क्षेत्रातसुद्धा लेडी गागा (Lady Gaga) हिने आपली यशस्वी छाप पाडली आहे. तिने एका लघुमालिकेत केलेल्या तिच्या अभिनयासाठी तिला पुरस्कार दिला गेला आहे. एवढंच नाही तर तिच्या गाण्यासाठी तिला अकॅडमी अवॉर्ड दिला गेला. हा अवॉर्ड मिळवणारी ती पहिली महिला आहे. याव्यतिरिक्त त्याच वर्षी तिला बाफ्ता अवॉर्ड, गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि ग्रॅमी अवॉर्ड देण्यात आला होता. (Lady Gaga)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community