कुंकू लावणे विवाहित महिलेचे धार्मिक कर्तव्य असून ती लग्न झालेल्या महिलेची निशाणी आहे, असे निरीक्षण इंदूर कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना नोंदवले. सुनावणीदरम्यान, कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला.
(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ठरला अवैध; कारण…)
न्यायालयाने पत्नीला सुनावले
विवाहितेने कुंकू न लावणे ही क्रूरता ठरेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. इंदूर येथील एका व्यक्तीने वैवाहिक संबंध पूर्ववत करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याचिकाकर्त्याने दावा केला होता, की गेल्या ५ वर्षांपासून त्याची पत्नी कोणतेही कारण नसताना त्याच्यापासून विभक्त राहत आहे. आता तिने सिंदूर म्हणजेच कुंकूही लावणे बंद केले आहे. दुसरीकडे, पती अंमली पदार्थांचे सेवन करून करून हुंड्यासाठी छळ करतो, असा आरोप विवाहित महिलेने केला होता. यावर इंदूर कौटुंबिक न्यायालयात (Family Court) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. विशेष बाब म्हणजे, जेव्हा महिला न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी आली होती. त्यावेळी देखील तिने कुंकू लावले नव्हते. न्यायालयाने तिला याबाबत विचारणा केली असता, तिने आपली चूक मान्य केली. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत पत्नीला कुंकू लावून पतीकडे राहण्याचे आदेश दिले.
Join Our WhatsApp Community