लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यात गुरुवार, २८ मार्च रोजी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
यामध्ये नागपूर मतदारसंघात 53 पैकी 26 अर्ज वैध ठरले आहेत, भंडारा-गोंदियामध्ये 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूरमाह्ये 12 पैकी 12, चंद्रपूरमध्ये 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल. (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Community