ऑक्टोबर महिन्यात झालेल्या हमास-इस्रायल युद्धानंतर (Israel Hamas War) अजूनही इस्रायलची गाझामध्ये लष्करी कारवाई सुरूच आहे. पॅलेस्टाईनमधून हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनवर अनेक कठोर निर्बंध लादले. परंतु त्यामुळे इस्रायलच्या अंतर्गत समस्या वाढल्या आहेत. शेती, बांधकाम, स्वच्छता, वृद्धांची सेवा-देखभाल इत्यादींसाठी इस्रायलला परदेशातील कामगारांवर अवलंबून रहावे लागते. हल्ल्यानंतर परदेशी कामगार मोठ्या संख्येने इस्रायल (Israel) सोडून निघून गेले आहेत.
४२ हजार कामगारांना नेण्याचा प्रस्ताव
भारतासोबतच्या करारानुसार इस्रायलमध्ये ४२ हजार कामगारांना नेण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश-हरियाणातून प्रत्येकी दहा हजार कामगार असतील. आतापर्यंत केवळ १ हजार भारतीय कामगार इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत, असे इस्रायलच्या स्थलांतरित विभागाचे म्हणणे आहे. हे कामगार खासगी विमानसेवेने येथे दाखल झाले आहेत. गाझा किंवा वेस्ट बँकचे रहिवासी सकाळीच कामावर हजर होत होते आणि सायंकाळी परतत होते. सध्या तरी भारतीय कामगारांना रहाण्याची व्यवस्था नाही. (indian workers in israil)
हमासच्या हल्ल्यात ३२ थाई नागरिक, शेती कामातील १० नेपाळी विद्यार्थी व चार फिलिपाइन्स परिचारिकांचा मृत्यू झाला होता. युद्धामुळे ३० हजार परदेशी कामगारांनी इस्रायल सोडले. सरकारने एक लाख पॅलेस्टाइन कामगारांच्या वर्क परमिट थांबवले आहेत. त्यामुळे इस्रायलमधले (Israel) बांधकाम क्षेत्र कोलमडले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community