Lok Sabha Election 2024 : पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जाते; काँग्रेसला घरचा आहेर

Lok Sabha Election 2024 : भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहेत. त्यांना जिंकविण्यासाठीच काँग्रेसने भंडाऱ्यात डमी उमेदवार दिला, असा आरोप वाघाये यांनी केला आहे.

321
Lok Sabha Election 2024 : पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जाते; काँग्रेसला घरचा आहेर
Lok Sabha Election 2024 : पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जाते; काँग्रेसला घरचा आहेर

भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार (Congress Candidate) देण्यात आला असून, पैसे घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून उमेदवारी दिली जाते. भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहेत. त्यांना जिंकविण्यासाठीच काँग्रेसने भंडाऱ्यात डमी उमेदवार दिला. लोकसभेत भाजप जिंकणार आणि त्या बदल्यात साकोली विधानसभेचा नाना पटोले यांचा मार्ग मोकळा होईल, असे गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये (EX Congress MLA Sevak Waghaye) यांनी केले आहेत.

(हेही वाचा – Election King Padmarajan : 238 वेळा निवडणुका हरलेले के. पद्मराजन; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील या विक्रमाची तुम्हाला माहिती आहे का ?)

विशेष म्हणजे हा आरोप काँग्रेसच्या माजी आमदारानेच केल्याने खळबळ उडाली आहे. सेवक वाघाये हे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून (Bhandara-Gondia Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत.

सेवक वाघाये यांचं शेवटच्या दिवशी नामांकन

काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना ती नाकारण्यात आली. काँग्रेस पक्षाने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेल्या सेवक वाघाये यांनी काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केलं.

या वेळी वाघाये म्हणाले की, मी लोकसभा लढावी, अशी जनतेची मागणी असल्याने उमेदवारी दाखल केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने केवळ दोन हजार मते मिळविली आणि अशाला काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भंडारा आणि गडचिरोली लोकसभेची तिकीट विकल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसमधील नेते पक्ष सोडून जात आहेत. गोंदियाच्या माणसाला गडचिरोलीची उमेदवारी दिली. पैसे देऊन उमेदवारी देणे हा चुकीचा कार्यक्रम आहे. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे. माझ्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेल. शक्य झाल्यास काँग्रेस वाचवण्यासाठी माझी उमेदवारी कायम राहील. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.