Utpal Dutt : अनेक चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवणारे उत्पल दत्त

Utpal Dutt : उत्पल दत्त यांना १९७० साली सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच त्याच वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणूनही तीन पुरस्कार देण्यात आले होते.

226
Utpal Dutt : अनेक चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवणारे उत्पल दत्त
Utpal Dutt : अनेक चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवणारे उत्पल दत्त

उत्पल दत्त यांचा जन्म २९ मार्च १९२९ साली बरीसाल येथे एका बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गिरिजारंजन दत्त असं होतं. उत्पल दत्त (Utpal Dutt) यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या सेंट झेवीयर कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचर हॉनर्स याविषयात आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं.

उत्पल दत्त हे एक भारतीय अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि नाटककार होते. कलकत्त्याचे रहिवासी असल्याने ते प्रामुख्याने बंगाली भाषेतल्या नाट्यक्षेत्रात काम करायचे. १९४९ साली त्यांनी लिटिल थिएटर ग्रुप स्थापन केला. उत्पल दत्त हे आधुनिक भारतीय थिएटर्सचे एक अग्रणी व्यक्तिमत्त्व बनले होते. त्यांच्या ग्रुपने अनेक इंग्रजी तसेच शेक्सपिअरच्या नाटकांचे सादरीकरण केलं होतं. त्यांच्या नाटकांमधून त्यांचं मार्क्सवादी व्यक्तिमत्त्व दिसून यायचं.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जाते; काँग्रेसला घरचा आहेर)

शंभरपेक्षा जास्त बंगाली आणि हिंदी चित्रपटांतून काम

त्यांनी कल्लोळ, माणूशेर अधिकार, लोहा मनोब, तिनेर तोलार आणि महाबिद्रोह यांसारखी अनेक नाटकं लिहिली. त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत शंभरपेक्षा जास्त बंगाली आणि हिंदी चित्रपटांतून कामही केलं होतं. त्यांपैकी भुवन शोम, अगंतुक, पद्मा नदीर माझी, गोलमाल आणि रंगबिरंगी हे प्रसिद्ध चित्रपट आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी दूरदर्शनवरील व्योमकेश बक्षी आणि सीमंत हिरा नावाच्या मालिकांमधूनही काम केलेलं आहे.

संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप पुरस्कार प्राप्त

उत्पल दत्त यांना १९७० साली सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच त्याच वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणूनही तीन पुरस्कार देण्यात आले होते. त्यानंतर १९९० साली संगीत नाटक अकॅडमी आणि भारतातील राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि थिएटर अकादमीने त्यांच्या रंगभूमीसाठी आजीवन केलेल्या सेवेसाठी त्यांना संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप (Sangeet Natak Akademi Awards) हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला गेला. १९ ऑगस्ट १९९३ साली उत्पल दत्त (Utpal Dutt) यांचं हार्ट अटॅकने निधन झालं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.