Lok Sabha Election 2024 : राज्यातील ४८ पैकी २३ लढती झाल्या निश्चित; कोण आहे कोणासमोर पहा…

आतापर्यंत भाजपाने २४, ठाकरे गटाने १७, काँग्रेसने १२, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ जागा तसेच शिवसेना शिंदेंकडून ८ उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे या सर्व लढती अजून कशा असतील यासाठी वाट बघावी लागेल.

326
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील जवळपास २३ लढती निश्चीत झाल्या आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे या लढती कशा असतील याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. पण, आतापर्यंत भाजपाने २४, ठाकरे गटाने १७, काँग्रेसने १२, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ जागा तसेच शिवसेना शिंदेंकडून ८ उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे या सर्व लढती अजून कशा असतील यासाठी वाट बघावी लागेल. पण, तरी काही जागांवरील उमेदवार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे २३ लोकसभा मतदार संघात लढती निश्चित झाल्या आहे. तर २५ लोकसभा मतदार संघात काही ठिकाणी एका पक्षाचे उमेदवार निश्चित झाले असले तरी प्रतिस्पर्धी उमेदवार अद्याप निश्चित नाही. त्यामुळे एक दोन दिवसात हे सुध्दा स्पष्ट होईल. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Utpal Dutt : अनेक चित्रपटांतून अभिनयाची जादू दाखवणारे उत्पल दत्त)

या २३ मतदार संघात अशा असतील लढती…
१.नागपूर – नितीन गडकरी (भाजप) – विकास ठाकरे (काँग्रेस)
२.भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (भाजप) – डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
३.गडचिरोली-चिमूर – अशोक नेते (भाजप) – डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
४.चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप) – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
५.हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) – हेमंत पाटील (शिंदे गट)
६.नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) – वसंतराव बळवंतराव चव्हाण(काँग्रेस)
७.नंदुरबार – डॉ. हिना गावित (भाजप) – गोवाल पाडवी (काँग्रेस)
८.बुलडाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) – प्रतापराव जाधव (शिंदे गट)
९.अमरावती – नवनीत राणा (भाजप) – बळवंत वानखेडे (काँग्रेस)
१०.रामटेक – राजू पारवे (शिंदे गट) – शामसुंदर बर्वे (काँग्रेस)
११.सांगली – चंद्रहार पाटील (ठाकरे गट) – संजयकाका पाटील (भाजप)
१२.कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे गट) – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
१३.हातकणंगले – धैर्यशील माने (शिंदे गट) – राजू शेट्टी (स्वाभिमानी)
१४.मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) – संजय दिना पाटील (ठाकरे गट) – मिहीर कोटेचा (भाजप)
१५.मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (ठाकरे गट) – राहुल शेवाळे (शिंदे गट)
१६.रायगड – अनंत गीते (ठाकरे गट) – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
१७.मावळ – संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) श्रीरंग बारणे (शिंदे गट)
१८.पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) – रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
१९.बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट) – सुनेत्रा पवार (अजित पवार गट)
२०.शिरुर – शिवाजी आढळराव (अजित पवार गट) – अमोल कोल्हे (शरद पवार गट)
२१.शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे (ठाकरे गट) – सदााशिव लोखंडे (शिंदे गट)
२२.लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजप)- शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
२३.सोलापूर – राम सातपुते (भाजप) प्रणिती शिंदे (काँग्रेस) (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.