अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) दिग्दर्शन केलेला आणि स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar ) यांची भूमिका अत्यंत ताकदीने साकरलेला चित्रपट गेल्या आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. मराठी भाषेतील चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विविध कलाकार आणि अभिनेते हा चित्रपट पहाण्याचे आवाहन दर्शकांना करत आहेत. मराठी चित्रपटात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यासाठी आवाज दिला आहे.
(हेही वाचा – सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय हाताळणारा कलाकार Vivaan Sundaram)
कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची कहाणी – सुबोध भावे
या निमित्ताने सुबोध भावे यांनी फेसबूक पोस्ट लिहून स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या भूमिकेला आवाज देण्याचा आनंद व्यक्त केला आहे. सुबोध भावेने फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजपासून सर्वत्र सावरकर हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित होत आहे. आदरणीय सुधीर फडके यांची निर्मिती असलेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटात मी एका ब्रिटीश पोलीस ऑफिसरची छोटीशी भूमिका केली होती. आणि आज रणदीप हुडा अभिनीत “सावरकर” या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या सावरकरांच्या भूमिकेला मराठी मध्ये आवाज देण्याची संधी मला मिळाली. आवर्जून हा चित्रपट पहा.
केवळ विनायक दामोदर सावरकर नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागाची ही कहाणी. ही प्रखर देशभक्त सावरकरांची कहाणी.
रणदीप हुडा यांनी साकारलेले सावरकर अवर्णनीय आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला एक अभिनेता म्हणून मनापासून सलाम, असे सुबोध भावे यांनी म्हटले आहे.
सुबोध भावे यांच्यासह इतरही कलाकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राविषयीच्या चित्रपटाचा प्रचार करत आहेत, तसेच चित्रपट पहाण्याचे आवाहन करत आहेत. (Swatantra Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community