- सुजित महामुलकर
अमरावती लोकसभा मतदार संघात नवा ट्विस्ट आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नातू आता अमरावती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. (Dr Babasaheb Ambedkar)
पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अमरावती हा लोकसभा मतदार संघ खूपच चर्चेचा विषय झाला आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा विरुद्ध महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार जनाशक्तीचे बच्चू कडू यांचा उमेदवार तसेच महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी अशी चौरंगी लढत होणार असल्याचे संकेत असल्याचे दिसत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता अमरावतीत बहुरंगी सामना रंगणार हे नक्की. आनंदराज हे पाहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. (Dr Babasaheb Ambedkar)
(हेही वाचा – सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय हाताळणारा कलाकार Vivaan Sundaram)
होय, अमरावती लढणारच
जमानालाल बजाज संस्थेतून मॅनेजमेंट विषयात मास्टर्स पदवी शिक्षण घेतलेले आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख असून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आहेत. इंदु मिल आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंबेडकर हे २ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. समाजमाध्यमांवर ‘होय, अमरावती लढणारच’ अशा मथळ्याखाली त्यांनी एक पोस्ट शेयर करत ही माहिती दिली. (Dr Babasaheb Ambedkar)
महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली
‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना आनंदराज यांनी सांगितले की, महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र ती त्यांना देण्यात आली नाही. त्यांचे बंधू प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे त्यांनी विचारणा केली नसल्याचे आनंदराज यांनी स्पष्ट केले. मात्र, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाठींबा असल्याचा दावा आनंदराज यांनी केलं. रिपब्लिकन सेनेच्यावतीने आनंदराज ही निवडणूक लढणार आहेत. (Dr Babasaheb Ambedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community