Savitri Jindal: भाजपामध्ये सामील होऊन पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करणार – सावित्री जिंदाल

सावित्री जिंदाल यांनी सोशल मिडियावर कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा नवीन जिंदाल याने तीनच दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

163
Savitri Jindal: देशातील सर्वात श्रीमंत महिला भाजपामध्ये, सावित्री जिंदाल म्हणाल्या...

हरियाणात राहणाऱ्या देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्यांना पक्षाचा ध्वज दिला. सावित्री यांच्यासोबत माजी महापौर शकुंतला राजलीवाला, सीमा जिंदाल, जगदीश जिंदाल, माजी जिल्हाध्यक्ष वेद रावल यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

सावित्री जिंदाल म्हणाल्या की, मनोहर लाल आणि नायबसिंह सैनीमध्ये राम आणि भरतचं रूप दिसतं. मनोहर लाल यांनी आपली खुर्ची सोडून नायबसिंग सैनी यांना दिली. यापेक्षा मोठे उदाहरण काय असू शकते.

(हेही वाचा – Jalgaon Shiv Jayanti : जळगावात शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक, १० जण ताब्यात)

याआधी सावित्री जिंदाल यांनी सोशल मिडियावर कॉंग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्यांचा मुलगा नवीन जिंदाल याने तीनच दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाने त्यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना सावित्री म्हणाल्या की, मुलगा नवीनचा भाजपामध्ये प्रवेश हा संपूर्ण कुटुंबाचा निर्णय आहे. काही काळापूर्वी मला कॉंग्रेसकडून निवडणूक लढवण्याची ऑफरही आली होती, पण त्यावेळी मला निवडणूक लढवावीशी वाटली नाही. आता मी भाजपामध्ये सामील होईन आणि पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत मिळेल.

हेही पहा –

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.