Priyanka Gandhi : प्रियंका गांधी राहुल गांधींवर नाराज

प्रियंका गांधी यांची लोकसभेची निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्यातल्या त्यात रायबरेलीमधून तर नाहीच नाही.

210
अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदार संघ म्हणजे गांधी आणि नेहरू कुटुंबाचा वारसा. मात्र, आता हा वारसा इतिहासात जमा होण्याच्या मार्गावर आहे. कारण, राहुल गांधी यांनी अमेठीमधून आधीच पळ काढला आहे आणि आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी  रायबरेलीमधून लढणार काय? असे विचारताच त्यांनीही हात वर केले आहेत. स्वत:ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वारसदार म्हणवून घेणाऱ्या प्रियंका गांधी या बंधु राहुल गांधी यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केवळ राहुल गांधी यांच्यावरच नव्हे  तर संपूर्ण कॉँग्रेस पक्षावर त्या प्रचंड  नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी आणि त्यांची टीम प्रियंका गांधी यांच्यावर रायबरेलीमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकत आहे. यामुळे प्रियंका गांधी नाराज आहेत.

कॉँग्रेसपुढे पेच 

प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची लोकसभेची निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्यातल्या त्यात रायबरेलीमधून तर नाहीच नाही. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता असू शकते. कारण, रायबरेलीमधून कुणीही लढले तरी भाजपापुढे कुणाचाच निभाव लागणार नाही, ही बाब सर्वज्ञात आहे. 80 जागांच्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात समझोता झाला आहे. सपाने कॉँग्रेससाठी 17 जागा सोडल्या आहेत. यातील 13 उमेदवारांची नावे कॉँग्रेसने जाहीर केली आहे. परंतु, अमेठी आणि रायबरेलीमधून कॉँग्रेसचा उमेदवार कोण असेल? हे अद्याप निश्चित झालेले नाही.

रायबरेली आणि अमेठीची नावे या यादीत नाही

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. दुस—या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुध्दा सुरू झाली आहे. तरीसुध्दा, काँग्रेससाठी पारंपरिक मानल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठीमध्ये अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. बुधवारी संध्याकाळी उशिरा काँग्रेसने यूपीमधून चार उमेदवारांची घोषणा केली पण पुन्हा एकदा रायबरेली आणि अमेठीची नावे या यादीत नाहीत.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेशिवाय जिंकतील का डॉ. अमोल कोल्हे?)

अमेठी आणि रायबरेलीची नावे यादीत नसल्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. पक्षाचे पदाधिकारी केवळ थांबा आणि बघण्याच्या स्थितीत आहेत. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही भागातील नेत्यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि गांधी घराण्यातील व्यक्तीला उमेदवार बनवण्याबाबत चर्चा केली. राहुल गांधी यांनी अमेठीमधून न लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते केरळच्या वायनाडमधून लढणार आहे. अशात रायबरेली हा एकमेव पारंपरिक मतदारसंघ उरलेला आहे. मात्र, प्रियंका गांधी सुध्दा येथून लढण्यास तयार नाहीत. अशात, गांधी आणि नेहरूंच्या मतदारसंघाचे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

वरूण गांधी अमेठीतून लढणार काय?

वरुण गांधी हे अमेठीमधून इंडिया अलायन्सचे उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाने पिलीभीतमधून वरूण गांधी यांना उमेदवारी नाकारली आहे. यानंतर या चर्चेने जोर पकडला आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेस काही मोठे नाव आणण्याची शक्यता अजूनही आहे.

काँग्रेसच्या बैठकीत अमेठी आणि रायबरेलीवर चर्चा नाही

लोकसभा निवडणुकीच्या आठव्या यादीपूर्वी बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वाने बरेच विचारमंथन केले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेश, गोवा, बिहार, झारखंड, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या लोकसभा जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत 40 नावांवर विचारमंथन करण्यात आले. परंतु, अमेठी आणि रायबरेलीचा विषय सुध्दा काढला नाही. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक 31 रोजी होणार आहे.

भाजपाने आपले पत्ते उघडले नाहीत

भाजपाने अमेठीतून स्मृती इराणी यांचे नाव फायनल केले असले तरी रायबरेलीमधून कुणाला उतरविणार? हे अद्याप स्पष्ट केले नाही. त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत. कुमार विश्वास यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मथुराही अनिश्चित

अमेठी आणि रायबरेली येथून अद्याप कार्ड उघडण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे मथुरा सीटवरही मंथन सुरू आहे. प्रयागराज लोकसभा मतदारसंघातून सपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रेवती रमण सिंह यांचा मुलगा उज्ज्वल रमण सिंह यांच्यावर पैज लावण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते लवकरच काँग्रेसचे सदस्यत्व घेणार आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.