आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात शुक्रवारी, २९ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली. गुड फ्रायडेची सुटी असूनही निदर्शनाच्या वेळी कार्यकर्त्यांची वाणवा पाहायला मिळाली. आंदोलनाच्या वेळी मैदान रिकामेच होते. यावेळी पोलिस आणि प्रसारमाध्यमांचीच गर्दी जास्त दिसत होती.
एकेकाळी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नेतृत्व केले होते. त्यावेळी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमली होती. ‘मी ही आण्णा’च्या टोप्या घातल्या होत्या. पण जेव्हा अरविंद केजरीवाल स्वतः अटकेत आहेत, अशा वेळी त्यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानात जेव्हा आंदोलन सुरु होते तेव्हा मात्र कार्यकर्त्यांची गर्दी दिसली नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत काही पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली तीही ऐकण्यास कार्यकर्ते कमी होते.
(हेही वाचा Nandurbar : नंदुरबारमध्ये हिंदूंच्या विरोधात तुघलकी आदेश काढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची केली तडकाफडकी गच्छंती)
काँग्रेस वगळता मित्र पक्ष ही गायब आणि कार्यकर्तेही गायब…
मुंबई काँगेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व इतर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानात येऊन निदर्शनास समर्थन दिले. उन्हाचा पारा वाढल्याने भर उन्हात कार्यकर्ते त्रस्त झाले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेबाबत सावध प्रतिक्रिया दिल्याने अण्णा हजारे यांचे समर्थक निदर्शनात दिसत नव्हते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शनास गर्दी होईल म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. प्रसिद्धी माध्यमांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Join Our WhatsApp Community