Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शनिवारी मोठा निर्णय घेणार

मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, असेही मराठा आंदोलनाचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

132
Manoj Jarange-Patil : लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शनिवारी मोठा निर्णय घेणार

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मनोज जरांगे शनिवारी मोठा निर्णय घेणार आहेत. या निर्णयाबाबत त्यांनी शुक्रवारी (२९ मार्च) अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला.

मनोज जरांगे ( Manoj Jarange-Patil) पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राजकारण हा माझा विषय नाही, मात्र समाजाची इच्छा आहे, म्हणून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. उद्या गावागावांतून अहवालाबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निर्णय जाहिर करण्यात येईल.

(हेही वाचा – Marathi Ukhane : लग्न-समारंभात मराठी उखाणे घ्यायला अडचण होते? मग आमचे ’हे’ उखाणे पाठ करुन ठेवा!)

समाजाला विश्वासात घेऊन निर्णय…
मराठ्याच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो, हे सगळं शनिवारी क्लियर होईल. मायबाप समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, असेही मराठा आंदोलनाचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांकडून जरांगेंना सज्जड दम
काहीजण उमेदवाराच्या नावाखाली वर्गणी जमा करत असेल, तर अशी कृती करणे अजिबात योग्य नसल्याचे म्हणत या निवडणुकीत एक रुपयाही लागणार नाही. त्यामुळे असले दुकान कोणीही सुरू नये, ज्यांनी असे केले असेल, त्यांनी ते परत करावे, नाहीतर त्यांना मिडियासमोर वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी वर्गणी जमा करणाऱ्या कार्यकर्त्यांना केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.