NIA: टीएमसीच्या ८ नेत्यांना एनआयएचे समन्स, भूपतीनगर स्फोटाप्रकरणी चौकशीला बोलावले

एनआयएने तृणमूल काँग्रेसच्या ८ जणांना शनिवारी सकाळी ११ वाजता अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

119
कुर्ल्याचा अमान शेख पाकिस्तान गुप्तचर संघटनेचा हस्तक; NIAने काय म्हटले पुरवणी आरोपपत्रात?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या ८ नेत्यांना समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगरमध्ये २०२२ मध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

एनआयएने तृणमूल काँग्रेसच्या ८ जणांना शनिवारी सकाळी ११ वाजता अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या समन्सनंतरही ते चौकशीत सहभागी झाले नाहीत, असे कारण देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना २८ मार्च रोजी कोलकाताजवळील न्यू टाऊन येथील एनआयए कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. भूपतीनगरमध्ये ३ डिसेंबर २०२२ रोजी स्फोटामुळे कच्च्या घराचे छत कोसळले होते. यात तिघांचा मृत्यू झाला होता. टीएमसी नेते कुणाल घोष यांनी शुक्रवारी एनआयएच्या या कारवाईमागे विरोधी भाजप असल्याचा आरोप केला आहे.

(हेही वाचा – Navneet Rana: भाजपामध्ये प्रवेश केल्यावर राणा यांची प्रहार संघटना आक्रमक, स्थानिक नेत्यांचाही विरोध)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.