नाशिकच्या जागेसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते. यामुळे नाशिकची जागा शिंदे गटाला सोडण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. या जागेवर राष्ट्रवादीनेही आग्रह धरल्याने हा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) राज्यसभेचा पर्याय देण्यात आल्याचे समजते. यामुळे भाजपाचा (BJP) हा प्रस्ताव अधिक सोयीचा वाटल्याने राष्ट्रवादीनेही या प्रस्तावाला सहमती दर्शविल्याचे समजले. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)
नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Lok Sabha Election 2024) भाजपा (BJP) शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना मंत्री भुजबळांचे नाव पुढे करून हा मतदारसंघ भाजपाकडेच ठेवण्याचा राजकीय डाव आखण्यात आला. भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी कार्ड खेळण्याचेही ठरले होते. मात्र सत्तांतरात शिंदे सेनेच्या १३ खासदारांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभेत निदान (Lok Sabha Election 2024) या १३ जागा तरी मिळाव्यात अशी खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. जर आपल्या जागांवर अतिक्रमण केले जाणार असेल तर उपयोग काय ? असा सवाल करण्यात आल्याने मुख्यमंत्रीही आपल्या हक्कांच्या जागांसाठी आक्रमक झाले आहेत. अशातच खासदार हेमंत गोडसे हे मुंबईत तळ ठोकून आहेत. शिंदे गटानेही दबाव वाढवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. भाजपाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना (DCM Ajit Pawar) राज्यसभा सदस्यत्व किंवा नाशिक लोकसभा मतदार (Lok Sabha Election 2024) संघाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे राज्यसभेचा प्रस्ताव राष्ट्रवादीला अधिक सोईचा वाटत असल्याने अजित पवार गट (DCM Ajit Pawar) नाशिकच्या जागेवर दावा सोडून देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता वाढली आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community