IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय 

IPL 2024, RCB vs KKR : सुनील नरेन आणि व्यंकटेश अय्यर यांच्या घणाघाती फलंदाजीने १८३ धावांचं आव्हानही कोलकाताने आरामात सर केलं 

158
IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय 
IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय 
  • ऋजुता लुकतुके

अखेर या हंगामातील १० व्या सामन्यात यजमान संघच दरवेळी सामना जिंकतोय हा भ्रम दूर झाला. त्यासाठी कारणीभूत ठरली ती सुनील नरेन (२२ चेंडूंत ४७) आणि व्यंकटेश अय्यर (३० चेंडूंत ५०) यांची दमदार फलंदाजी. त्याला फिल सॉल्ट (३०) आणि श्रेयस अय्यर (३९) यांनी दिलेली तितकीच मजबूत साथ. या चौघांमुळे विजयासाठी असलेलं १८३ धावांचं आव्हान कोलकाता नाईट रायडर्सना कठीण गेलंच नाही. यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ७ गडी आणि १९ चेंडू राखून सहज पराभव झाला. या हंगामात हा पहिला सामना होता जिथे यजमान संघाचा पराभव झाला. (IPL 2024, RCB vs KKR)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेचा पर्याय ?)

विराट कोहलीची (Virat Kohli) ५९ चेंडूंत ८३ धावांची खेळीही व्यर्थ गेली. कोलकाताच्या फलंदाजांचा धडाकाच असा होता की, बंगळुरूचे महत्त्वाचे गोलंदाज मोहम्मद सिराज (३ षटकांत ४६), यश दयाल (४ षटकांत ४६) आणि अझारी जोसेफ (२ षटकांत ३४) यांची पार पिसं निघाली. तिघांच्या गोलंदाजीवर किमान षटकामागे १५ या गतीने धावा कुटल्या गेल्या. तिथेच कोलकाताचा पराभवही निश्चित झाला. (IPL 2024, RCB vs KKR)

कोलकाताचा जुना शिलेदार सुनील नरेनसाठी (Sunil Narine) हा सामना संस्मरणीय ठरला. एकतर हा त्याचा तब्बल ५०० वा टी-२० सामना होता. तो यादगार झाला त्याच्या कामगिरीने. गोलंदाजीत त्याने ४० धावा देत ग्लेन मॅक्सवेलचा महत्त्वाचा बळी घेतला. तर फलंदाजीत सलामीला येताना त्याने कमाल केली. २२ चेंडूंत ४७ धावा करताना त्याने ५ षटकार आणि २ चौकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळेच कोलकाताची सुरुवात दणक्यात झाली. सातव्या षटकातच संघाच्या ८३ धावा फलकावर लागल्या. इथंच सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. पुढचं काम व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस यांनी पूर्ण केलं. (IPL 2024, RCB vs KKR)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)

त्यापूर्वी बंगळुरूच्या संघानेही घरच्या मैदानावर ६ बाद १८३ अशी चांगली धावसंख्या उभारली. यात एकट्या विराट कोहलीचा वाटा होता ५९ चेंडूंत ८३ धावांचा. पुन्हा एकदा ऑरेंज कॅप विराटने डोक्यावर चढवली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरुन ग्रीन यांनीही त्याला चांगली साथ दिली. नंतरच्या टप्प्यात आंद्रे रसेल (Andre Russell) आणि अनुकुल रॉय यांनी टिच्चून गोलंदाजी करत बंगळुरूच्या धावांना खिळ घालण्याचं काम केलं. (IPL 2024, RCB vs KKR)

(हेही वाचा- Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच)

या सामन्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सहाव्या तर कोलकाता नाईटरायडर्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. (IPL 2024, RCB vs KKR)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.