- ऋजुता लुकतुके
भारताच्या परकीय गंगाजळीत (Indian Forex Reserves) सलग पाचव्या आठवड्यात वाढ झाली आहे. २२ मार्चच्या उपलब्ध आकेडवारीनुसार, आता भारताचा परकीय चलन साठा ६४२.६३ अब्ज अमेरिकन डॉलरवर (American Dollar) स्थिरावला आहे. मागच्या एका आठवड्यात या १३९ दशलक्ष अमेरिकन डॉलरची वाढ झाली. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. (Indian Forex Reserves)
(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीचा षटकारांचा नवीन विक्रम; गेल, धोणी यांना टाकलं मागे )
India’s forex reserves jump to record high https://t.co/G2TOXx18sC pic.twitter.com/1h85o4JIcY
— Reuters Business (@ReutersBiz) March 29, 2024
भारताची परकीय गंगाजळी (Indian Forex Reserves) म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताचा पडून असलेला निधी. इथं आपल्याकडे किती पैसे जमा आहेत. आपणं किती देशांना देणं लागतो याचा हिशेब ठेवलेला असतो. दर आठवड्याला याची शिल्लक रक्कम देशाची मध्यवर्ती बँक (central bank) जाहीर करत असते. (Indian Forex Reserves)
(हेही वाचा- Rohit Sharma in Mumbai : रोहीत शर्माचं मुंबईत ‘असं’ झालं स्वागत)
रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत मोठे चढ उतार झाले तर हाच निधी मध्यवर्ती बँक (central bank) रुपयेच्या स्थिरतेसाठी वापरते. सध्या भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८३.४० रुपयांच्या आसपास आहे. मार्च महिन्यात परकीय गंगाजळीचा नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी ६३८ अब्ज अमेरिकन डॉलर हा उच्चांक होता. पण, एकाच आठवड्यात तो मागे सरून परकीय गंगाजळी आता ६४० अब्ज अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) वर गेली आहे. (Indian Forex Reserves)
(हेही वाचा- Hardik Pandya Frustrated : हार्दिक पांड्याचा राग जेव्हा मैदानातच निघतो…)
परकीय गंगाजळीतून रुपयाची अमेरिकन डॉलरच्या (American Dollar) तुलनेत स्थिरता आपल्या समजू शकते.