2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी मेनिफेस्टो कमिटी जाहीर केली. समितीमध्ये एकूण 27 सदस्य आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन या समितीच्या संयोजक असतील, तर पियुष गोयल यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)
याशिवाय चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि छत्तीसगडचे विष्णुदेव साय या समितीत आहेत.
अर्जुन मुंडा, किरेन रिजिजू, अश्विनी वैष्णव, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी यांसारख्या मोठ्या नावांचाही या समितीत समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Mahadev Jankar : महादेव जानकरांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीत उमेदवारी)
…..सहप्रभारींची घोषणा
भारतीय जनता पक्षाने दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक 2024 साठी राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली होती. या यादीत 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांची नावे समाविष्ट आहेत. तर, एकूण 18 नावे आहेत. ज्यामध्ये 10 प्रभारी आणि 8 सहप्रभारींच्या नावांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
ओपी धनखर यांना दिल्लीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. डॉ.अल्का गुर्जर यांना दिल्लीचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. महाराष्ट्राचा पदभार खासदार डॉ. दिनेश शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसेच, येथे दोन सहप्रभारी बनवण्यात आले असून त्यात निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्या नावांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community