राज्यातील एकूण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत सुमारे १ लाख १६ हजार ५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Lok Sabha Election) करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना 12 डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली
भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत 190 अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे. राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरणासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656 Flying Squad Team (FST) व 2096 Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. (Lok Sabha Election)
Join Our WhatsApp Community