IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीने रिंकू सिंगला दिली खास भेट

कोलकाता नाईटरायडर्स संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंगला किंग कोहलीने सामन्यानंतर एक खास भेट दिली.

166
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीने रिंकू सिंगला दिली खास भेट
IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीने रिंकू सिंगला दिली खास भेट

कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ७ विकेटने दारुण पराभव केला. कोलकात्याने आयपीएलमध्ये (IPL 2024) सलग दोन सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकार झेप घेतली आहे. आरसीबीकडून फक्त विराट कोहलीने झुंज दिली. विराट कोहलीने शानदार नाबाद 83 धावांची खेळी केली, यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीशिवाय एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पराभव झाला, पण विराट कोहलीचा मनाचा मोठेपणा सध्या चर्चेत आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कोलकात्याच्या रिंकू सिंह याला काही टिप्स दिल्या. त्याशिवाय आपली बॅट भेट दिली. विराट कोहलीकडून बॅट भेट मिळाल्यानंतर रिंकू सिंह (Rinku Singh) याने स्पेशल पोस्ट करत धन्यवाद म्हटलेय. याचे फोटोही त्याने पोस्ट केले आहेत. विराट कोहली आणि रिंकू सिंह (Rinku Singh) याच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी रात्री सामना झाल्यानंतर बंगळुरू आणि कोलकाता संघातील खेळाडूंनी एकमेंकांशी हातमिळवणी केली. सामन्यानंतर केकेआरचे खेळाडू आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. याचा व्हिडीओ आरसीबीने एक्सवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये आरसीबीचे कोच अँडी प्लॉवर यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवणारे भाषण केले. आरसीबीने पोस्ट केलेल्या याच व्हिडीओत विराट कोहली (Virat Kohli) याने रिंकू सिंह (Rinku Singh) याला आपली बॅट गिफ्ट केल्याचेही दिसतेय. त्याशिवाय दोघांची गळाभेट झाल्याचेही दिसतेय. यासंदर्भात फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरजार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांकडून विराट कोहलीचे कौतुक केले जात आहे. मॅच हरल्याचे दु:ख असतानही किंग कोहलीकडून दाखवलेल्या तत्परतेची चर्चा सुरु आहे.

विराट कोहली (Virat Kohli) याचं रिकू सिंह (Rinku Singh) यानं आभार मानले आहेत. रिंकूने विराट कोहलीसीठी (Virat Kohli) खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यानं सल्ला दिल्याबद्दल आणि बॅटबद्दल विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार मानले आहेत. रिंकू सिंह याच्याशिवाय केकेआरनेही या दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. विराट आणि रिंकू यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

बंगळुरुच्या मैदानावर कोलकात्याविरोधात आरसीबीचे खेळाडू संघर्ष करत होते. ठरावीक अंतराने विकेट फेकत होते, पण दुसऱ्या बाजूला विराट कोहली पाय रोवून उभा होता. विराट कोहलीने (Virat Kohli) अखेरच्या चेंडूपर्यंत कोलकात्याचा सामना केला. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. आरसीबीने 20 षटकांत 182 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये लोगोपाठ दोन अर्धशतके ठोकली आहे. पण विराट कोहलीच्या संथ फलंदाजीमुळे त्याचावर काहींनी टीका केली, पण काहींनी इतरांनी साथ न दिल्यामुळे विराट कोहलीला संथ खेळावं लागलं, असं म्हटलेय.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.