IPL 2024, Hardik Pandya: मुंबई संघात दोन तट? हार्दिकच्या ट्रोलिंगवर संघात चर्चा

मुंबई इंडियन्सचे पुढील ४ सामने मुंबईतच आहेत.

207
IPL 2024, Hardik Pandya: मुंबई संघात दोन तट? हार्दिकच्या ट्रोलिंगवर संघात चर्चा

आयपीएल २०२४ चा (IPL 2024, Hardik Pandya) हंगाम सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सच्या संघातून हार्दिक पांड्याला आपल्या संघात परत घेतलं. हार्दिक पांड्याला संघात घेताना त्याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. मुंबईचं कर्णधारपद २०१३ ते २०२३ पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले.

मुंबईचा पहिला सामना नरेंद्र मोदी मैदानावर गुजरातविरुद्ध झाला. यावेळी रोहित शर्माच्या चाहत्यांनी मैदान गाजवत हार्दिक पांड्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा सामना हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला. एस.मानसिंग मैदानावर देखील उपस्थित चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणा दिल्या. याचदरम्यान मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यंदा राज्यभरातून किती मतदार घरबसल्या मतदान करणार, जाणून घ्या आकडा )

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना या चार सामन्यांसाठी चाहत्यांचं पाठबळ मिळणार आहे. मात्र गेल्या दोन सामन्यांचा विचार करता वानखेडे मैदानावर रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर या सामन्यासाठी पोलीस आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था मैदानावर ठेवण्यात येणार आहे. हार्दिक पांड्याला ज्या व्यक्तीकडून ट्रोल केले जाईल, त्या व्यक्तीला थेट मैदानाबाहेर काढणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र मैदानावर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक असल्याचे सुरक्ष रक्षकांना हे कितपत जमेल, हे त्यावेळीच समोर येईल.

मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

मुंबईचे पुढील 4 सामने
मुंबई विरुद्ध राजस्थान (1 एप्रिल 2024)
मुंबई विरुद्ध दिल्ली (7 एप्रिल 2024)
मुंबई विरुद्ध आरसीबी (11 एप्रिल 2024)
मुंबई विरुद्ध चेन्नई (14 एप्रिल 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.