राज्यातील कॉँग्रेस (Congress) नेत्यांनी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिल्यानंतर कॉँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी उबाठावर शेलक्या शब्दात टीका केली. तसेच कॉँग्रेसच्या (Congress) पाठिंब्याशिवाय शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) राज्यात एकही लोकसभा जागा जिंकू शकत नाही, असे खुले आव्हान दिले. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा- NPS Rule Change : १ एप्रिलपासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल)
वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावर अद्याप एकमत झाले नसून सांगली, भिवंडी आणि मुंबई दक्षिण-मध्य या जागांवर कॉँग्रेसने (Congress) दावा केला आहे. यावर तोडगा निघण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून कॉँग्रेसने या वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी, असा प्रस्ताव ठेवला. (Sanjay Nirupam)
कॉँग्रेस पाठिंब्याशिवाय उबाठा एकही जागा जिंकू शकत नाही
या प्रस्तावाला शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) कडाडून विरोध केला असून ‘सर्वच जागांवर मैत्रीपूर्ण लढत करा,’ अशा शब्दात उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. यावर निरुपम यांनी पलटवार करत ‘X’ या समाजमाध्यमावर शिवसेना उबाठाला उघड आव्हान दिले आणि “कॉँग्रेस (Congress) पाठिंब्याशिवाय उबाठा एकही जागा जिंकू शकत नाही, आणि हे माझे आव्हान आहे,” असे म्हटले. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा- Maratha Kranti Morcha : महापालिकेचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान)
..अन्यथा काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार
“असंही मुंबईतील मराठी भाषकांमध्ये उबाठाबाबत प्रचंड नाराजी आहे. आशा करतो की, कॉँग्रेस (Congress) नेतृत्वाने या ‘प्रवक्त्यां’च्या धमकीला घाबरू नये. अन्यथा महाराष्ट्रातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा पुरता बंदोबस्त केला जाईल,” असा गर्भित इशाराही निरुपम यांनी दिला. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा- Veer Savarkar : देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींना खास ऑफर; म्हणाले…)
मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव कॉँग्रेस हाय कमांडने फेटाळला
दरम्यान, राज्यातील कॉँग्रेसने (Congress) दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव कॉँग्रेस हाय-कमांडने सपशेल फेटाळत महाविकास आघाडीचा धर्म पाळा, असा सल्ला दिला. यावरून कॉँग्रेस (Congress) नेत्यांमध्येही नाराजी पसरली असून सांगलीत मैत्रीपूर्ण लढत नाही झाली तर बंडखोरी करण्याची तयारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. (Sanjay Nirupam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community