रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका केलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपट नुकताच मराठीत प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहाण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीस यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांना आवाहन करतो की, त्यांनीही स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट पहावा. जर राहुल गांधी (Rahul Gandhi) हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर त्यांच्यासाठी मी स्वखर्चाने सगळे सिनेमागृह आरक्षित करून देईन. हा सिनेमा पाहिल्यावर ते जे वीर सावरकर यांच्याविषयी बिनबुडाचे बोलतात ते बोलणे बंद करतील.’
(हेही वाचा – Veer Savarkar : देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींना खास ऑफर; म्हणाले…)
मणिपूर फाइल्स हा चित्रपट काढावा – उद्धव ठाकरेंचे आव्हान
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या या आव्हानानंतर कॉंग्रेसनेही कोणती प्रतिक्रिया दिलेली नसतांना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांनाच उलट आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “मी देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण जाण्याचा येण्याचा खर्च करतो, त्यांचा हॉटेलचा खर्च करतो. त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. त्यांनी लडाखमध्येही जाऊन यावे. मी खर्च करायला तयार आहे. दार्जिलिंगमध्ये एका व्यक्तीला दिलेली वचनं कशी मोडली, ते भेटून माहिती घ्यावी. अरूणाचलमध्ये जाऊन यावं. त्यांच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे. काश्मिरी पंडितांना त्यांनी भेटावं. बॉलीवुडची मंडळी आता राजकारणात येत आहेत. तर एखाद्या निर्मात्याला सोबत घेऊन फडणवीसांनी मणिपूर फाइल्स हा चित्रपट काढावा,” असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
आता बाजू पलटली ?
गांधी घराण्याचा सावरकरद्वेष उघड आहे. राहुल गांधी हेही सावरकरद्वेषाचे राजकारण करत आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना आव्हान दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तर हा सावरकरद्वेषच आहे, अशी सावरकरप्रेमींची भावना आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली होती, तेव्हाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओही आता पुन्हा व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, कालच्या सभेमध्ये राहुल गांधी जेव्हा त्यांना पळपुटे म्हणाला, तेव्हा मी एकटा होतो की, राहुल गांधीला नालायक म्हणून त्याला जोडे मारले पाहिजेत असे म्हटले.
एकेकाळी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सावरकरद्वेषासाठी त्यांना नालायक म्हणून जोडे मारण्याची भाषा करणारे आता मात्र राहुल गांधींच्या सावरकरद्वेषाची एकप्रकारे पाठराखण करत आहेत, अशी राष्ट्रप्रेमींची भावना आहे.
थेटरसाठी लागणारे पैसे जर टँकरसाठी वापरले तर… – सुप्रिया सुळे
याच प्रकरणी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही सावरकरद्वेष दाखवला आहे. याच्याशी देशातील पाणीप्रश्नचा संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘थेटरसाठी लागणारे पैसे जर टँकरसाठी वापरले तर त्याचा राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जास्त फायदा होईल.’ अशा प्रकारे क्रांतीकारकांचा अपमान करणाऱ्या सुप्रिया सुळेंविरोधातही नाराजी व्यक्त केली जात आहे. (Swatantra Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community