भारताने कचाथीवू बेट (Katchatheevu Island Dispute) श्रीलंकेला देण्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत, विशेषतः तामिळनाडूमध्ये तापला आहे. रामेश्वरम आणि श्रीलंकेदरम्यान असलेले हे बेट इंदिरा गांधी सरकारने श्रीलंकेला दिले होते. एका आरटीआय चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आम्ही कधीही काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही.”
(हेही वाचा – PM Narendra Modi मेरठ मधून करणार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात)
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर सांगितले की,
ही बातमी डोळे उघडणारी आणि धक्कादायक आहे. काँग्रेसने कशाप्रकारे निष्काळजीपणे कचाथीवूचा त्याग केला हे नवीन तथ्यांवरून दिसून येते. यामुळे प्रत्येक भारतीय संतप्त झाला आहे आणि लोकांच्या मनात हे रुजले आहे की आम्ही काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही! भारताची एकता, अखंडता आणि हितसंबंधांना कमी लेखणे ही ७५ वर्षांपासून काँग्रेसची काम करण्याची पद्धत आहे.(Katchatheevu Island Dispute)
Eye opening and startling!
New facts reveal how Congress callously gave away #Katchatheevu.
This has angered every Indian and reaffirmed in people’s minds- we can’t ever trust Congress!
Weakening India’s unity, integrity and interests has been Congress’ way of working for…
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2024
(हेही वाचा – K D Singh ED : टीएमसीच्या माजी खासदारावर ईडीची मोठी कारवाई; ३ राज्यांतील मालमत्ता जप्त)
लोकांना आपल्या भूतकाळातील संपूर्ण सत्य माहित असणे महत्वाचे :
पंतप्रधानांनंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही यावर आपली मते मांडली. ते म्हणतात की लोकांना आपल्या भूतकाळातील (Katchatheevu Island Dispute) संपूर्ण सत्य माहित असणे महत्वाचे आहे. हा वस्तुस्थितीवर आधारित लेख प्रत्येक नागरिकाशी संबंधित असावा.
(हेही वाचा – LK Advani Bharat Ratna : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान)
काँग्रेसपासून सावधान!
एकीकडे इंच इंच लढवू म्हणत आपल्या प्राणांची आहुती देणारे आपले सैनिक. आणि दुसरीकडे भारत देश म्हणजे आपल्या बापजाद्याची प्रॉपर्टी समजणारी काँग्रेस. हे चित्र पूर्वापार चालत आलं आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.
१९७४ मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 31, 2024
१९७४ पर्यंत हे बेट भारताकडे होते :
कचाथीवू बेट (Katchatheevu Island Dispute) हे रामेश्वरमपासून २० किमी अंतरावर वसलेले एक निर्जन बेट आहे, जिथे फक्त एकच चर्च अस्तित्वात आहे. १९७४ पर्यंत हे बेट भारताकडे होते. नंतर त्याला श्रीलंकेच्या ताब्यात देण्यात आले. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी तपशीलवार सामायिक केली आहे, ज्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले. (Katchatheevu Island Dispute)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community