CRIME: सोलापुरात गावठी पिस्तूल राऊंडसह लोखंडी वाघनखे जप्त

यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एकजण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

162
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड आणि वाघनखे जप्त केली आहेत. अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे (वय २६, रा. पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते.  (CRIME)

यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एकजण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी ती माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना फोनद्वारे कळविली. त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलीस गेले. तेथे एक इसम संशयितरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले.

(हेही वाचा – Notice To Congress: कॉंग्रेसला १७४५ कोटींची नवीन टॅक्स नोटीस, आयटी विभागाने काढलेल्या कर मागणीमुळे 3567 थकबाकी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.