रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपट नुकताच मराठीत प्रदर्शित झाला आहे. सावरकरप्रेमींनी हिंदी भाषेतील चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्नारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी विशेष आवाहन केले आहे.
जर तुम्हाला तुमच्या भावी पिढ्यांनी या देशात राहावे आणि सन्मानाने जगावे, तसेच भारत एक सक्षम राष्ट्र बनावे, असे वाटत असेल, तर तुमच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट दाखवा, असे रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.
अगर आप चाहते हो की आपकी आनेवाली पीढ़िया इस देश में जिन्दा रहे और सम्मान से साथ जिए, भारत एक समर्थ संपन्न राष्ट्र बने – तो आपके बच्चोंको ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ मुव्ही दिखाइए !
आजही..
अभी..@Dev_Fadnavis @mieknathshinde @JPNadda @RandeepHooda pic.twitter.com/7YYiXUz9NK— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) March 31, 2024
(हेही वाचा – 50th Convocation : मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५०वा दीक्षांत समारंभ, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती)
चित्रपट यशस्वी करणे, ही राष्ट्रप्रेमींची जबाबदारी
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट चालू नये, असा जोरदार प्रयत्न सुरू आहे. देशविघातक डाव्या विचारसरणीची ही मंडळी खरंतर मूठभर आहेत. आपली संख्या खूप आहे. त्यांना आपली ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे. आपल्या देशावर जीव ओवाळून टाकणार्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि असंख्य क्रांतिकारकांचे कार्य, आपला प्रेरणादायी इतिहास सांगण्याचे काम रणदीप हुड्डा यांनी केले आहे. आता हिंदी, मराठी चित्रपट यशस्वी करणे, ही राष्ट्रप्रेमींची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी स्वत: तर हा चित्रपट पहावाच, पण आपले शेजारी, सगे-सोयरे, आपल्या घरी, कार्यालयात काम करणारी मंडळी, तरुण मुलांना तिकिटे काढून ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवावा, असे आवाहन सावरकरप्रेमी करत आहेत. (Swatantra Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community